टेनिस विश्वाचा राजा समजला जाणारा रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आता मोठा धक्का दिला आहे.

​टेनिस विश्वाचा राजा निवृत्त

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने निवृत्ती जाहीर केली. ४१ वर्षीय फेडररने एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या लेवर कपमध्ये तो अखेरची व्यवसायिक स्पर्धा खेळणार आहे.

​२४ वर्षात १ हजार ५०० हून अधिक सामने आणि…

फेडररने २४ वर्षाच्या करिअरमध्ये २० ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याने एकूण १०३ स्पर्धांचे विजेतेपद मिळवले. फेडररने विंब्लडनची ८, ऑस्ट्रेलियन ओपनची ६, अमेरिकने ओपनची ५ तर क्ले कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच ओपनचे १ विजेतेपद मिळवले आहे.

फेडररचे भावनिक पत्र

शेवटची स्पर्धा पुढील आठवड्यात

फेडरर आता आपला अखेरचा सामना लेव्हर कपमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २५ सप्टेंबर या काळात लंडन येथे खेळवण्यात येणार आहे.

​सर्वाधिक कमाई

गेल्या महिन्यात फेडरर सर्वाधिक कमाई करणारा टेनिसपटू ठरला होता. त्याने सलग १७ वर्ष हा पराक्रम केला होता. त्याचे एकूण उपन्न ९० मिलियन डॉलर (जवळ जवळ ७१८ कोटी रुपये) इतके होते. हे उपन्न एजेंटची फ्री आणि कर कपातीनंतरचे आहे. फेडररने ही सर्व कमाई जाहिरात, व्यवसाय आणि इव्हेंटच्या माध्यमातून कमावली आहे.

​सर्वाधिक वेळा नंबर वन

टेनिस क्रमवारीत सर्वाधिक काळ नंबर एकवर राहण्याचा विक्रम फेडररच्या नावावर आहे. फेडरर एकूण २३७ आठवडे अव्वल स्थानावर होता.

​अखेरचे ग्रँड स्लॅम

फेडररने २८ जानेवारी २०१८ साली ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद मिळवले होते. हे त्याचे अखेरचे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. तेव्हा २० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला होता. अर्थात त्यानंतर त्याची कामगिरी घसरत गेली. २०२१ मध्ये त्याने फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here