रॉजर फेडरर गोमातेचा ‘भक्त’

रॉजर फेडररचे जगभरात चाहते आहेत. फेडरर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात खेळत असला तरी त्याचे चाहते त्याला पाठिंबा देण्यासाठी पोहोचतात. टेनिस कोर्टात फेडररला खेळताना तुम्ही खूप पाहिलं असेल, पण त्याचं आयुष्यही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. फेडररचे गायीवरील प्रेम कुणापासूनही लपलेले नाही. २००३ मध्ये पहिल्यांदा विम्बल्डन जिंकल्यानंतर गस्टाड ओपनच्या आयोजकांनी त्याला एक गाय भेट दिली. फेडररने आपल्या गायीचे नाव गंगा ठेवले, परंतु गाईचे पूर्वीचे नाव ज्युलिएट होते. गाय हा स्वित्झर्लंडचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि तो पर्यटकांना खूप आकर्षित करतो. २०१३ च्या उन्हाळ्यात, जेव्हा रॉजर फेडररने पुन्हा गस्टाड खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने त्याला देसीरी नावाची दुसरी गाय भेट दिली होती.
विजेतेपदांचा बादशाह

रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीत १०३ एटीपी एकेरी विजेतेपद पटकावले आहेत. या बाबतीत तो एकूणच दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉजर फेडररच्या नावावर सलग २३७ आठवडे जागतिक खेळाडूंच्या ओळीत प्रथम क्रमांकावर राहण्याचा विक्रम आहे. एकूण ३१० आठवडे तो प्रथम क्रमांकावर कायम होता. ४१ वर्षीय टेनिस स्टारने एकूण २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. आणि यावरून तो टेनिस इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. रॉजरने २००३ ते २००९ या कालावधीत २८ प्रमुख स्पर्धांपैकी २१ स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, त्याच्याकडे ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक देखील आहे.
सर्वाधिक कमाई

गेल्या महिन्यात फेडरर सर्वाधिक कमाई करणारा टेनिसपटू ठरला होता. त्याने सलग १७ वर्ष हा पराक्रम केला होता. त्याचे एकूण उत्पन्न ९० मिलियन डॉलर (७१८ कोटी रुपये) इतके होते. एह उत्पन्न एजंटची फी आणि कर कपटी नंतरचे आहे. फेडररने ही सर्व कमाई जाहिरात, व्यवसाय आणि इव्हेंटच्या माध्यमातून कमवली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ४ सप्टेंबर २०२२ पर्यंत, या टेनिस स्टारची एकूण संपत्ती ५५० दशलक्ष होती. टेनिस व्यतिरिक्त, तो अनेक प्रसिद्ध ब्रँडशी जोडलेला आहे आणि त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. यातील एक मोठे नाव रोलेक्सचे आहे. फेडरर २००६ पासून रोलेक्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि त्याला मोबदल्यात त्याला मोठी रक्कम मिळते.
फेडरर महागड्या गाड्यांचा शौकीन

एकीकडे रॉजर फेडरर मोठ्या संपत्तीचा मालक आहे, तर दुसरीकडे त्याला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. फेडररकडे अनेक मर्सिडीज कार आहेत. यामध्ये मर्सिडीज एएमजी जीटी एस, मर्सिडीज जीएलई जी663 कूप, मर्सिडीज एसएल एएमजी, मर्सिडीज एसएल एएमजी रोडस्टर आणि मर्सिडीज सीएलएस 450 याशिवाय अनेक मर्सिडीज बेंझ क्लासिक वाहनांचा समावेश आहे. मर्सिडीज व्यतिरिक्त, महान टेनिसपटूकडे रेंज रोव्हर एसव्हीआर देखील आहे.
२०१४ ला भारत दौर्यावर स्टार्ससोबत टेनिस कोर्टवर

२०१४ च्या भारत दौऱ्यावर, रॉजर फेडरर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर, बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोण, आमिर खान, अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्यासोबत प्रदर्शनी सामने खेळण्यासाठी नवी दिल्लीतील टेनिस कोर्टवर उतरला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर फेडरर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणसोबत १९७८ मध्ये आलेल्या डॉन चित्रपटातील खैके पान बनारसवाला या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसला. २०१४ च्या दौऱ्यात फेडररने भारतीय जेवणाचा आस्वादही घेतला होता. त्यावेळेस फेडरर आयटीसी मौर्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला पोहोचला होता. फेडररने कुल्फी, फिरनी, गुलाब जामुनसह मुर्ग मलाई कबाब, सीख कबाब, तंदूरी गोबी, तंदूरी आलू, दाल बुखारा आणि नान बुखारीची ऑर्डर दिली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times