वाचा-
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार धोनी येत्या २ जुलैपासून क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात करणार आहे. धोनी देशातील विविध भागातील युवा खेळाडूंना ऑनलाइन प्रशिक्षण येणार असून यासाठी त्याने सुरू केली आहे. धोनी वय वर्ष ६ ते ८ पर्यंतच्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देणार आहे. धोनी प्रशिक्षणाची सुरूवात लहान मुलांपासून करणार असला तरी त्यानंतर तो सिनिअर स्तरावरील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करेल.
वाचा-
धोनीची ही अकादमी आर्का स्पोर्ट्स प्राव्हेट लिमिटेड सोबत मिळून प्रशिक्षण देणार आहे. २ जुलै रोजी म्हणजे येत्या गुरुवारी याची सुरूवात होईल. या ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत आम्हाला विविध राज्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लवकरच आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देणार आहोत, असे आर्काच्या एका गुंतवणूकदाराने मुंबई मिररला सांगितले.
वाचा-
याआधी आर्काने प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. आतापर्यंत २०० प्रशिक्षकांनी त्याचा फायदा घेतला आहे. २ जुलैपासून खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल. हे संपूर्ण प्रशिक्षण धोनीच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डेरिक कलिनन या प्रोजेक्टचा डायरेक्टर आहे.
धोनीने २०१७ साली दुबईत क्रिकेट अकादमी सुरू केली होती. पण तो स्वत: क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे अकादमीला अधिक वेळ देऊ शकला नव्हता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times