नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर फलंदाजीत अनेक विक्रम आहेत. क्रिकेट समीक्षकांनी सचिनला कधीच एक चांगला गोलंदाज असे म्हटले नाही. पण सचिनने करिअरमध्ये अनेक वेळा अशी काही गोलंदाजी केली आहे ज्यामुळे सर्वांना हे मान्यच करावे लागेल की तो एक चांगला गोलंदाज देखील होता. सचिन मीडियम पेस, स्लो मीडियम पेस आणि ऑफ स्पिन तसेच लेग स्पिन करायचा. खेळपट्टीच्या गरजेनुसार तशा पद्धतीची गोलंदाजी करण्याचे कौशल्य सचिनकडे होते.

२००४ साली सचिनने एक अफलातून चेंडू टाकला होता. या चेंडूची दखल आयसीसीने घेतली होती. याचा उल्लेख नंतर #SachinGooglyoftheCentury असा केला जाऊ लागला. सचिनने टाकलेला हा चेंडू पाहिल्यानंतर तेव्हाचे दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नसह अन्य गोलंदाजांचे डोळे उघडले. शेन वॉर्नने १९९३ साली टाकलेल्याय चेंडूला परदेशी मीडियाने बॉल ऑफ द सेंचुरी म्हटले होते. पण सचिनच्या या चेंडूची कौतुक तितके झाले नाही. ज्याचा तो खरा हकदार होता.

भारताचा संघ २००४ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. मुल्तान येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ५२ धावांनी विजय मिळवला होता. हा तोच सामना आहे ज्यात विरेंद्र सेहवागने ३०९ धावांची वादळी खेळी केली होती. भारताने पहिला डाव ५ बाद ६७५ धावांवर घोषित केला.

पाकिस्तानला पहिल्या डावात ४०७ धावा करता आल्या. या सामन्यात सचिनने दोन विकेट घेतल्या होत्या. सचिन या सामन्यात लेग स्पिनर होता आणि खालच्या क्रमांकावर आलेल्या मोइन खानची त्याने बोल्ड घेतली होती.

सचिनच्या त्या शानदार चेंडूवर मोइन खानला नाचवले. त्या दिवशाचा अखेरचा चेंडू होता आणि मोइनला कळाले देखील नाही की चेंडू कसा आला आणि तो बाद झाला. मोइन तो चेंडू लेग स्पिन म्हणून खेळायला गेला पण तो होता गुगली. सचिनच्या चेंडू फक्त आतल्या बाजूला आला नाही तर बॅट आणि पॅडच्या मधून विकेटवर गेला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here