नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने २००७ साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वखाली आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला नव्हता. तेव्हाचा टीम इंडियाचा कर्णधार राहुल द्रविडने () मास्टर ब्लास्टर () आणि () यांना दक्षिण आफ्रिकेत झालेला हा वर्ल्ड कप खेळण्यापासून रोखले होते.

वाचा-
आयसीसीच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे भारतीय संघाचे व्यवस्थापक राहिलेले लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांनी हा खुलासा केला. सिनिअर खेळाडूंचे असे मत होते की, क्रिकेटच्या या नव्या प्रकारात युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. जेणेकरून कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली ते मुक्तपणे खेळतील. भारतीय संघाने सर्व शंकांना खोटे ठरवत वर्ल्ड कप स्पर्धेत शानदार कामगिरी केली आणि विजेतेपद मिळवले.

स्पोर्ट्सक्रीडा सोबत फेसबुक लाइव्ह चॅटवर बोलताना राजपूत म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की, राहुल द्रविडने सचिन आणि सौरवला २००७ चा टी-२० वर्ल्ड कप खेळण्यापासून रोखले होते. राहुल इंग्लंड दौऱ्यात भारताचा कर्णधार होता. काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यानंतर टी-२० साठी थेट जोहान्सबर्ग गेले. तेव्हा सिनिअर खेळाडूंनी सांगितले की, या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी द्यावी. अर्थात वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या सिनिअर खेळाडूंना त्याचा पश्चाताप झाला. कारण त्यानंतर सचिन मला नेहमी म्हणायचा की, मी इतके वर्ष खेळला पण आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलो नाही.

वाचा-
या स्पर्धेत जगाला प्रथमच धोनीचे नेतृत्व पहायला मिळाले. महत्त्वाच्या आणि कठिण प्रसंगी तो कशा शांत राहतो आणि योग्य निर्णय घेतो हे क्रिकेट जगाने पाहिले. धोनी एक चांगला आणि यशस्वी कर्णधार होऊ शकतो, याची मला जाणीव होती असे राजपूत म्हणाले.

वाचा-
खर सांगायचे झाले तर धोनी खरच खुप शांत राहतो. विरोधी संघापेक्षा दोन पाऊले पुढचा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. तो आणि सौरव गांगुली यांचे मिश्रण होता. गांगुली खेळाडूंना प्रोत्साहन देत असे. तो असा एक कर्णधार होता ज्याने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलली. धोनीने ही परंपरा पुढे नेली. त्याने अनेक खेळाडूंना संधी दिली. तो कधीच मैदानावर चिडला नाही आणि खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी संधी देत राहिला असे, राजपूत म्हणाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here