वाचा-
संजय डोभाल यांना करोना व्हायरसची लागण झाली होती. करोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना बहादुरगढ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने डोभाल यांना द्वारका येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पण प्लाझ्मा थेरेपीचा तुमच्या वर कोणताही परिणाम झाला नाही, असे डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा-
डोभाल हे दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावरील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. दिल्लीकडून खेळलेले क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मिथुन मन्हास या खेळाडूंमध्ये ते लोकप्रिय होते. सोनेट क्लब क्रिकेट स्पर्धेत डोभाल खेळले होते.
करोनावर उपचार सुरू असताना गंभीर आणि मन्हास यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डोभाल यांच्यासाठी प्लाज्मा डोनेशनचे आवाहन केले होते. आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांनी डोभाल यांच्यासाठी डोनरची व्यवस्था केली होती.
वाचा-
संजय डोभाल यांच्या अचानक निधनामुळे क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. डीसीसीए या कठिण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे ट्वीटमध्ये म्हटले.
डोभाल यांच्या निधनाने धक्काबसला. क्रिकेटमधील एक महत्त्वाची व्यक्ती आज आपण गमवली आहे. देशात अशा एकही खेळाडू नसेल ज्यांची डोभाल यांनी मदत केली नसेल. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने म्हटले आहे.
करोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. यात आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times