नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतिक्षा जर कोणत्या गोष्टीची असेल तर ती म्हणजे आयपीएलचा १३वा हंगाम कधी सुरू होईल याची होय. कोरना व्हायरसमुळे नियोजित वेळेत होऊ शकले नाही. आता बीसीसीआयकडून सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या आयोजनाचा विचार सुरू आहे. अशातच भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने आयपीएलमधील ऑल टाइम संघाची निवड केली आहे. या संघाचे नेतृत्व एका भारतीय खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे.

वाचा-
आयपीएल स्पर्धेचे सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मुंबई संघाने मिळवले आहे. या चारपैकी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यश मिळवले आहे. असेच यश महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन वेळा मिळवले आहे. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आयपीएलमधील ऑल टाइम संघाचे नेतृत्व धोनीकडे दिले आहे. धोनीने केल्या काही वर्षात हायव्होल्टेज सामने खेळल्याचे चोप्राने म्हटले.

वाचा-
सलामीवीर म्हणून आकाश चोप्राने ख्रिस गेलच्या ऐवजी डेव्हिड वॉर्नरला संधी दिली आहे. वॉर्नरने सातत्यापूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याचा समावेश केल्याचे चोप्राने म्हटले. गेल धमाकेदार फलंदाजी करतो पण त्यात सातत्य नाही. संघातील दुसरा सलामीवीर म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा समावेश केला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूचा कर्णधार विराट कोहलीला तिसरे स्थान दिले आहे. तर चेन्नई संघातील सुरेश रैनाचा समावेश चौथ्या क्रमांकासाठी केलाय. रैना हा जलद आणि फिरकीपटू अशा दोन्ही गोलंदाजांचा सामना करू शकतो असे चोप्राने म्हटले. याशिवाय आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा चोप्राने मधळ्या फळीतील फलंदाज म्हणून समावेश केलाय.

वाचा-
गोलंदाजांमध्ये हरभजन आणि सुनील नरेन या दोन फिरकीपटूंसह भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि लसित मलिंगा यांचा समावेश केला आहे.

असा आहे आकाश चोप्राचा ऑल टाइम आयपीएल संघ-एम.एस (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिव्हिलिअर्स, हरभजन सिंग, सुनील नरेन, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह आणि लसित मलिंगा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here