नवी दिल्ली: काही विक्रम असे असतात की ते स्वत:च्या नावावर व्हावेत असे कोणत्याही खेळाडूला वाटत नाही. पण चुकून असे विक्रम एखाद्याच्या नावावर झाले तर आयुष्यभर ते त्यांच्याशी जोडले जातात. खेळाडू कितीही महान असो पण त्याने केलेल्या अशा नकोशा विक्रमाची चर्चा अनेक वेळा केली जाते. अशाच एक नकोसा वाटणारा विक्रम भारताच्या एका महान फलंदाजाच्या नावावर आहे. जाऊन घेऊयात त्याबद्दल…

वाचा-
भारताचे महान फलंदाज यांच्या नावावर असलेल्या एका नकोशा विक्रमाबद्दल अनेकांनी प्रश्न विचारले, पण त्याचे उत्तर मिळाले नाही आणि यापुढे मिळण्याची शक्यता नाही.

वाचा-
१९७५ साली झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत ७ जून रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने २०२ धावांनी विजय मिळवला. तेव्हा वनडे सामना ६० ओव्हरचा होत असे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४ बाद ३३४ धावा केल्या. उत्तरादाखल भारताने ६० षटकात ३ बाद फक्त १३२ धावा केल्या आणि भारताचा २०२ धावांनी पराभव झाला.

वाचा-
या सामन्यात सुनिल गावस्कर यांनी एकनाथ सोलकर यांच्या सोबत डावाची सुरूवात केली आणि ते अखेरच्या षटकापर्यंत बाद झाले नाही. गावस्कर यांनी १७४ चेंडू खेळले आणि फक्त ३६ धावा केल्या. त्यांनी इतकी संथ गतीने फलंदाजी का केली हे आतापर्यंत न उलघडलेले कोडे आहे.

वाचा-
भारताची फलंदाजी सुरू असताना कर्णधार वेंकटराघवन यांनी अनेक वेळा १२व्या खेळाडूच्या मार्फत गावस्कर यांना निरोप पाठवला. पण गावस्कर यांनी फलंदाजी तशीच सुरू ठेवली. ते असे का वागले, त्यांच्या मनात काय चालले होते हे फक्त गावस्करांनाच माहीत.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

10 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here