कोलंबो: सध्या टी-२० क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे. पण जागतिक क्रिकेटमध्ये असा एक फलंदाज होता जो ५० षटकाची वनडे मॅच टी-२० प्रमाणे खेळायचा. वनडे क्रिकेटमधील फलंदाजीची शैली बदलून टाकणाऱ्या या क्रिकेटपटू सनथ जयसूर्याचा आज ५१वा वाढदिवस आहे. १९९०च्या दशकात प्रतिस्पर्धी संघाचे एकच लक्ष्य असायचे ते म्हणजे श्रीलंकाचा धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याला बाद करायचे. कारण सर्वांना माहित होते की जर तो एकदा क्रीझवर टीकला तर त्याला थांबवणे अशक्य असते. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर तूटन पडणाऱ्या जयसूर्याच्या विक्रमांबद्दल जाणून घेऊयात….

वाचा-
वनडे क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्याने अशी काही फलंदाजी केली ज्याचा कोणी तेव्हा विचार देखील केला नव्हता. फक्त ४८ चेंडूत शतक असो की १७ चेंडूत अर्धशतक असे विक्रम जयसूर्याने केले होते. आक्रमक फलंदाजीचे दुसरे नाव जयसूर्या झाले. क्रिकेटमध्ये एक गोलंदाज म्हणून सुरुवात करणाऱ्या जयसूर्याला श्रीलंकेचे कोच डेव वॉटमोर आणि कर्णधार अर्जुन राणातुंगा यांनी फलंदाज केले. त्यानंतर रमेश कालुविथराणाच्या सोबत त्याने सलामीला येत अशी काही फलंदाजी केली की गोलंदाजाच्या मनात भीती निर्माण झाली. चेंडू कसा ही असो जयसूर्या त्यावर तुटून पडायचा. त्याने वनडे क्रिकेटच्या खेळाची व्याख्याच बदलली.

वाचा-

आजच्या दिवशी १९६९ मध्ये श्रीलंकेत जन्मलेल्या जयसूर्याने त्याच्या फलंदाजीने क्रिकेट जगतावर स्वत:ची छाप उमटवली. जेव्हा १९९६ साली श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो मालिकावीर ठरला होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने ४४ चेंडूत ८२ धावा केल्या.

वाचा-
वर्ल्ड कपनंतर त्याच वर्षी पाकिस्ताविरुद्ध झालेल्या एका सामन्यात जयसूर्याने प्रथम ६५ चेंडूत १३४ आणि नंतर फक्त १७ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. जयसूर्याने फक्त वनडेत नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये देखली धमाकेदार फलंदाजी केली होती. त्याने १९९७-९८ साली भारताविरुद्ध ३४० धावा केल्या. लंकेकडून कसोटी झालेल्या त्या सर्वाधिक धावा होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानावर २१३ धावा केल्या.

वाचा-
जयसूर्याने फक्त फलंदाजीत नाही तर गोलंदाजीत देखील स्वत:ची छाप उमटवली. २००७ साली वनडेत ३०० विकेट घेणारा तो फक्त तिसरा गोलंदाज ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०० वनडे खेळणारा ते पहिला क्रिकेटपटू होता.

जयसूर्याने लंकेकडून ११० कसोटी सामन्यात ४०.१च्या सरासरीने ६ हजार ९७३ धावा केल्या. यात १४ षटकार आणि ३१ अर्धशतकांचा समावेश होता. वनडेत त्याने ४४५ सामने खेळले त्यात ३२.४च्या सरासरीने १३ हजार ४३० धावा. यात २८ शतक आणि ६८ अर्धशतक केलीत. तर ३१ टी-२० क्रिकेटमध्ये ६२९ धावा. जयसूर्याने २००८ ते १० या काळात आयपीएलमध्ये ३० सामने खेळलेत. IPLमध्ये नाबाद ११४ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here