नवी दिल्ली: जगातील सर्वोत्त क्षेत्ररक्षक कोण या प्रश्नावर डोळ्या समोर सर्वात प्रथम चेहरा येतो तो दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी र्‍होड्स याचा. सामना जिंकण्यासाठी जशी फलंदाज आणि गोलंदाज यांची महत्त्वाची भूमिका असते तशीच ती क्षेत्ररक्षकाची देखील असते. म्हणून तर म्हटले जाते catches win matches…

वाचा-
भारतीय क्रिकेटमध्ये देखील एकापेक्षा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक झाले आहेत. पण या यादीत ज्याचे नाव सर्वसाधारणपणे घेतले जात नाही. अशा एका खेळाडूच्या अफलातून कॅच बद्दल जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेटमधील द वॉल अशी ओळख असलेल्या हा एक सर्वोत्तम फलंदाजाबरोबर सर्वोत्तम फिल्डर देखील आहे. द्रविडने करिअरमध्ये मुख्यता शॉर्ट लेग आणि सिली पॉइंट या ठिकाणी फिल्डिंग केली. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने द्रविडच्या सर्वोत्तम कॅचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वाचा-
राहुल द्रविडने करिअरमध्ये अनेक शानदार कॅच घेतले आहेत. या व्हिडिओत त्याने घेतलेले काही कॅच एकत्र दाखवले आहेत. या व्हिडिओवर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने कौतुक केले आहे.

वाचा-
गजब कॅच घेणारा राहुल द्रविड असे म्हणत हरभजन सिंगने हा व्हिडिओ शेअर केलाय.

द्रविडने भारताकडून १६४ कसोटी सामने खेळले यात त्याने ५२.३१च्या सरासरीने १३ हजार २८८ धावा केल्या. तर २१० कॅच पकडले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. कसोटीत २०० हून अधिक कॅच घेण्याची कामगिरी फक्त द्रविड वगळता दोघांनी केली आहे.

वाचा-
सर्वाधिक कॅच घेणाऱ्या यादीत श्रीलंकेचा महेला जयवर्धने याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने १४९ कसोटीत २०५ कॅच घेतले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आहे. त्याने १६६ सामन्यात २०० कॅच पकडले आहेत.

कसोटी सर्वाधिक कॅच घेणारे भारतीय
> राहुल द्रविड- २१०
> व्हीव्हीएस लक्ष्मण- १३५
> सचिन तेंडुलकर- ११५
> सुनिल गावस्कर-१०८
> मोहम्मद अझरुद्दीन- १०५

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here