लंडन: कोरना व्हायरसचे संकट अद्याप गेलेले नाही. काही देशात रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशा वातावरणात सुरक्षेची काळजी घेऊन काही खेळ सुरू झाले आहेत. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांनी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. आता हे दोन्ही संघ कसोटी मालिका खेळणार आहेत. वेस्ट इंडिजनंतर पाकिस्तानसोबत इंग्लंडची लढत होणार आहे. यासाठी रविवारी पाकचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडमध्ये पोहोचला. पण पाकिस्तानच्या या खेळाडूंनी करोना काळात एक मोठी चुक केली.

वाचा-
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी १० खेळाडूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा दुसरी चाचणी घेतल्यानंतर ते नेगेटिव्ह आली आणि मग हे सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले. करोना व्हायरसचे संकट असताना विशेष काळजी घेण्याची गरज असताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी अतिशय महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन केले.

वाचा-

ज्या प्रमाणे वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडू १४ दिवस क्वारंटाइन झाले होते. त्याच प्रमाणे पाकिस्तानच्या खेळाडूंना क्वारंटइन होण्याचे आदेश दिले होते. पण पाक संघातील खेळाडूंनी दुसऱ्याच दिवशी नियम मोडला आणि क्वारंटइनमधून बाहेर पडून खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरले.

एका बाजूला जगातील अन्य क्रिकेट संघ कोणताही धोका पत्करण्यास तयार नसताना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने धाडसी निर्णय घेत प्रथम वेस्ट इंडिज दौऱ्याला परवानगी दिली. त्यानंतर पाकिस्तान संघाला ३ कसोटी आणि ३ टी-२० मालिकेसाठी इंग्लंडमध्ये बोलवले. त्यानुसार पाकिस्तानचा संघ रविवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या १४ दिवसांच्या क्वारंटाइनला सुरूवात झाली. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी या नियमाचे काटेकोटपणे पालन केले होते.

वाचा-
पाकिस्तानचा संघ मंगळवारी मैदानावर अगदी निवांतपणे सराव करत होता. संघातील २० खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरले होते. पाकचा संघ वॉरिस्टर शायर येथे उतरला आहे. त्यांना याच ठिकाणी १३ जुलैपर्यंत क्वारंटाइन रहायचे होते. पाकिस्तान क्रिकेटपटूंची तीन दिवसातील दुसरी करोना चाचणी नेगेटिव्ह आली आहे.

वाचा-

स्वत:च्या देशाचे स्पेलिंग चुकीचे लिहले!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्याला जाणारे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत असताना बोर्डाने एक मोठी चुक केली. संघाची माहिती सोशल मीडियावर देताना बोर्डाने स्वत:च्या देशाचे स्पेलिंग चुकीचे लिहले. बोर्डाने पाकिस्तान म्हणजे स्वत:च्या देशाचे स्पेलिंग Pakistan ऐवजी Pakiatan असे लिहले होते. ही चूक त्यांनी मागे घेतली. पण तोपर्यंत ट्रोलर्सने त्यांच्या ट्वीटचे स्क्रिनशॉर्ट व्हायरल केले. या चुकीबद्दल पाकिस्तान बोर्डाला युझर्सनी जोरदार ट्रोल केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here