भारताने बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात माहिती तंत्रज्ञान विभागाकडे अनेक तक्ररी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता. भारतात युट्यूबहून अधिक युजर्स हे अॅपचे आहेत. टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स असल्याचं सांगण्यात येतंय. तर हेलो अॅपचे भारतात ४० हजार युजर्स आहेत.
वाचा-
चीनी अॅपवरील बंदीचा सर्वात मोठा फटका टिकटॉकला बसला आहे. हे अॅप भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या बंदीवर भारताची नेमबाज हीना सिधूने एक ट्विट केले आहे.
टिकटॉकवरील बंदीमुळे मी प्रचंड आनंदी आहे. या अॅपवरील व्हिडिओचा मला प्रचंड राग येत होता. पण आता मी आनंदी आहे. टिकटॉकशिवायचे इंटरनेट एक आनंदी ठिकाण असेल, असे हीनाने पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर हिनाने आणखी एक ट्विट केले आहे. यात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असून ते होता कामा नयेत याची काळजी सरकार घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
वाचा-
केंद्र सरकारने वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अॅप्सवर बंदी घातली आहे.
वाचा-
दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याचा परिणाम व्यापारावरही होत आहे. करोनाचा संसर्ग आणि दोन्ही देशात सुरू असलेल्या तणावामुळे सुमारे ३० टक्के व्यापार घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही देशांना याचा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारताने २२ जूनपासूनच चीनमधून येणाऱ्या मालावर अतिरिक्त कस्टम शुल्क लागू केले आहे. त्यामुळे अॅपल, सिस्को, डेलसारख्या मोठ्या कंपन्यांना याचे नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४३ जवान ठार झाल्याचा दावा भारतीय सूत्रांनी केला होता. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव सुरू आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times