वाचा-
जागतिक क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे ज्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अखेरची कसोटी खेळली होती. पाकिस्तानचा क्रिकेटपटू खालिद हसनने फक्त १६ वर्ष आणि ३५२ दिवस असताना अखेरची कसोटी खेळली. पाकच्या या खेळाडूने इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम खालिदच्या नावावर होता. पण काळाच्या वेगात ते मागे पडले.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन राजा यांच्या नावावर आहे. अर्थात त्यांच्या वयावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण अधिकृतपणे राजा यांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यांनी १४ वर्ष २२७ दिवशी झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले.
वाचा-
यांच्या नावावर सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम भलेही नसला तरी एक विक्रम मात्र आजही त्यांच्या नावावर आहे. कदाचीत हा विक्रम त्याच्या नावावर असावा अशी त्यांची इच्छा नसावी.
पाकिस्तानकडून फक्त एक कसोटी सामना खेळलेल्या खालिद हसन यांचे कसोटी करिअर फक्त ५ दिवसांचे राहिले. १६ वर्ष ३५२ दिवशी त्यांनी पदार्पण केले आणि १६ वर्ष ३५६ व्या दिवशी ते संपले देखील. सर्वात कमी वयात करिअर संपणारे ते क्रिकेटपटू आहेत.
वाचा-
खालिद यांचा जन्म १४ जुलै १९३७ रोजी पेशावर शहरात झाला. त्यांनी एकमेव कसोटी सामन्यात १७ धावा केल्या. यात दोन विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी प्रथम श्रेणीत १७ सामन्यात ११३ धावा आणि २८ विकेट घेतल्या. ३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे लाहोर येथे निधन झाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times