वाचा-
आयसीसीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बुधवारी झालेल्या गव्हर्निंग बॉडीच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. जोपर्यंत आयसीसीच्या नव्या अध्यक्षाची निवड होत नाही. तोपर्यंत शशांक मनोहर यांच्या सोबत सहाय्यक म्हणून काम करणारे इम्रान ख्वाजा हे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील.
वाचा-
आयसीसीचे कार्यकारी अधिकारी मनु साहनी म्हणाले, मी आयसीसीच्या बोर्डाच्या वतीने आणि सर्व स्टाफच्या वतीने तसेच पूर्ण क्रिकेट परिवाराकडून मनोहर यांनी दिलेल्या नेतृत्वासाठी तसेच अध्यक्ष म्हणून पार पाडलेल्या जबाबदारीसाठी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
वाचा-
मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची जबाबदारी घेण्याआधी मनोहर २००८ ते २०११ आणि नोव्हेंबर २०१५ ते मे २०१६ काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते. आयसीसीच्या नियमानुसार एका व्यक्तीला सलग सहा वर्ष अध्यक्षपदावर राहता येत. त्यानुसार मनोहर यांना आणखी दोन वर्षाचा कालावधी मिळू शकत होता. पण त्यांना स्वत:ला तिसऱ्यांदा अध्यक्षपद नको आहे.
वाचा-
नव्या अध्यक्षपदासाठी आयसीसीच्या बोर्डाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. आयसीसीच्या नव्या अध्यक्षपदासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कोलिन ग्रावेस हे मुख्य दावेदार मानले जात आहेत. हॉगकॉगचे इम्रान ख्वाजा देखील या पदाच्या शर्यतीत होते. पण आयसीसीमधील पूर्ण सदस्य देशांचा त्यांना पाठिंबा नाही.
इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज बोर्डाने ग्रावेस यांना पाठिंबा दिला आहे. पण बीसीसीआयने अद्याप त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही. मनोहर यांच्या तुलनेत ग्रावेस आणि बीसीसीआयचे संबंध चांगले राहिले आहेत. मनोहर यांच्यावर भारतीय क्रिकेटच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. एन.श्रीनिवासन अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या विरुद्ध निर्णय घेतल्याचे म्हटले गेले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times