नवी दिल्ली: भारतीय संघातील सलामीवीर रोहित शर्मासाठी २०१९चा शानदार असा ठरला होता. या स्पर्धेत रोहितने पाच शतक केलीत. एका वर्षापूर्वी आजच्या दिवशी रोहितने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. रोहितचे हे वर्ल्ड कपधील चौथे शतक होते आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज होता. बांगलादेशची धुलाई करताना रोहितने श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. तर सौरव गांगुलीच्या तीन शतकांचा विक्रम मागे टाकला.

वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हिटमॅन रोहितने ९२ चेंडूत १०४ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात बांगादेशच्या तमीम इकबालने डावाच्या सुरुवातीला रोहितचा एक सोपा कॅच सोडला आणि त्याचा फायदा घेत रोहितने शतक ठोकले.

वाचा-

रोहित आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी २९.२ षटकात १८० धावा जोडल्या. रोहित १०४ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ राहुल ७७ धावांवर रुबेल हसनच्या चेंडूवर बाद झाला. मग विराट कोहलीने २६ तर ऋषभ पंतने ४८ धावा केल्या. धोनीने ३५ धावांचे योगदान दिले.

वाचा-
भारताने बांगलादेशला ५० षटकात ३१५ धावांचे आव्हान दिले. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि सैफुद्दीन यांनी अर्धशतकी खेळी केली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. ४८ षटकात बांगलादेशचा डाव २८६ धावांवर संपुष्ठात आला आणि भारताने सामना २८ धावांनी जिंकला. भारताकडून जसप्रित बुमराहने चार विकेट घेतल्या.

वाचा-
रोहितने २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. या स्पर्धेत रोहितने ५ शतकांसह ६४८ धावा केल्या. पण सेमीफायनल सामन्यात आणि अन्य आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. सचिननंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. फक्त दोन वर्ल्ड कप खेळणाऱ्या रोहितने ६ शतकं केली आहेत. तर सचिनच्या नावावर ६ स्पर्धेत ६ शतकांची नोंद आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here