वाचा- …
एव्हर्टन वीक्स यांचा जन्म वेस्ट इंडिजमधील बारबाडोस या बेटावर झाला. त्यांनी वेस्ट इंडिजकडून ४८ कसोटी सामने खेळले. सर क्लाइट वॉल्कॉट आणि सर फ्रॅक वारेल यांच्या सोबत त्यांनी ५०च्या दशकात जागतिक क्रिकेटमधील सर्वात मजबूत अशी फलंदाजीची फळी तयार केली होती. यामुळेच त्यांना कॅरेबियने देशातील क्रिकेटचे पितामह म्हटले जाते.
वाचा-
वीक्स, वॉल्कॉट आणि वारेल या तिघांचा जन्म ऑगस्ट १९२१ ते जानेवारी १९२६ या १८ महिन्याच्या कालावधीत झाला होता. पुढे या तिघांनी १९४८साली तीन आठवड्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वारेल यांचे १९६७ साली तर वॉल्कॉट यांचे २००६ साली निधन झाले. ब्रिजटाऊनमधील राष्ट्रीय स्टेडियम या तिघांच्या थ्री डब्ल्यूज ओव्हल या नावाने ओळखले जाते.
वाचा-
वीक्स यांनी १९४८ ते ५८ या काळात ५८.६२च्या सरासरीने ४ हजार ४५५ धावा केल्या. यात १५ शतकांचा समावेश होता. वीक्स यांची टायमिंग सुंदर होती. ते चेंडूची लेंथ लगेच ओळखायचे. त्यांनी १५२ प्रथम श्रेणी सामन्यात १२ हजार १० धावा केल्या. यात त्यांची सरासरी ५५.३४ इतकी होती तर ३६ शतकांचा समावेश होता. ३०४ ही त्यांची सर्वोच्च खेळी होती.
वाचा-
कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच शतक करण्याचा विक्रम वीक्स यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंड आणि भारताविरद्ध १९४८ मध्ये पाच शतक केली.
तुमच्या फलंदाजीबद्दल मी वेस्ट इंडिजच्या इतर दिग्गज खेळाडूंकडून खुप ऐकले आहे. आम्ही तुम्हाला नेहमी मिस करू. भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट सचिनने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
वाचा-
क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी वीक्स यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. एक सभ्य आणि चांगले व्यक्ती होते. ते आमच्या क्रिकेट खेळाचे पितामह होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ.
निवृत्ती घेतल्यानंतर वीक्स क्रिकेटमधून दूर गेले नाहीत. प्रशिक्षक, प्रशासक आणि मॅच रेफरी म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७९ च्या वर्ल्ड कपमध्ये ते कॅनडाचे कोच होते. २००९ साली आयसीसी हॉल ऑफ फ्रेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. १९९५ साली त्यांना नाइटवुड अर्थात सर ही उपाधी देण्यात आली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times