कोलंबो: २०११ साली झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना फिक्स झाला होता आणि हा वर्ल्ड कप भारताला विकल्याच्या आरोपाची श्रीलंकेत कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी चौकशी समितीने आज माजी कर्णधार याची जवळपास १० तास चौकशी केली.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेटनी पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताच्या या विजेतेपदावर श्रीलंकेच्या माजी क्रीडमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अंतिम सामन्यावेळी महिंदनंदा अळूठगमगे हे लंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत वर्ल्ड कपमधील हा सामना फिक्स झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर २०११च्या लंकेच्या वर्ल्ड कप समितीचे प्रमुख असेलल्या अरविंदा डिसिल्वाने याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी काल निवड समिती प्रमुख डिसिल्वा आणि माजी फलंदाज उपल तरंगा यांची चौकशी झाली होती. डिसिल्वाची चौकशी पथकाकडून तब्बल सहा तास चौकशी केली. डिसिल्वा हे २०११च्या श्रीलंकेच्या संघाचे मुख्य निवड समितीचे प्रमुख होते.

आज संगकाराची चौकशी सुरू असताना त्याच्या चाहत्यांनी क्रीडा मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने केली. सरकार माजी खेळाडूंना त्रास देण्यासाठी चौकशी करत असल्याचे चाहत्यांनी म्हटले. दरम्यान या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळण्यास सुरूवात झाली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले साजिथ प्रेमदासा यांनी सोशल मीडियावरून या चौकशीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सरकार २०११च्या वर्ल्ड कपमधील देशाच्या हिरो कुमार संगकारासह अन्य खेळाडूंचा छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारताकडून पराभव झालेल्या अंतिम सामन्यात संगकारा श्रीलंकेचा कर्णधार होता. प्रथम फलंदाजी करत त्यांनी २७५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ९१) यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला.

माजी क्रीडामंत्री अळूठगमगे यांनी केलेले आरोप संककारा आणि महेला जयवर्धने यांनी याआधीच फेटाळून लावले आहेत. या दोघांनी अळूठगमगे यांना पुरावे देण्यास सांगितले होते. आता श्रीलंकेचे क्रीडा मंत्रालय याप्रकरणी काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here