वाचा-
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी साजरा करण्याचे ठरवले आहे. या सप्ताहात शेतकऱ्यांना आधिनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. त्याच बरोबर त्याविषयी जगृती केली जाणार आहे. हा सप्ताह एक ते सात जुलै या काळात साजरा केला जात आहे.
वाचा-
कृषी संजीवनी सप्ताह संदर्भात रहाणे याने ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, मी आशा करतो की तुम्ही सर्व जण सुरक्षित असाल आणि योग्य ती काळजी घेत असाल. मी स्वत: एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकरी शेतात किती मेहनत घेतो याची मला जाणीव आहे. शेतकऱ्याबद्दल खुप आदर आणि प्रेम आहे. सध्या करोना व्हायरसच्या संकटात देखील शेतकरी रात्रंदिवस परिश्रम घेत असल्यामुळे आपल्याला अन्न मिळत आहे. येणारा आठवडा १ ते ७ जुलै हा आठवडा कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करत आहोत. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, कृषी विषयक उपक्रमाबद्दल त्यांना माहिती दिली जाईल. तसेच आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा प्रगतीचा मार्ग नक्की सोपा होईल. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या या उपक्रमासाठी मी त्यांचे आभार मानतो.
वाचा-
अजिंक्य रहाणेचा हा व्हिडिओ कृषी मंत्री दादीजी भुसे यांनी शेअर केला आहे.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times