नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये टर्बनेटर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फिरकीपटू हरभजन सिंगचा आज ४०वा वाढदिवस (Happy Birthday )आहे. जवळपास दोन दशके भारतीय संघाकडून खेळेल्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा शानदार विजय मिळवून दिले आहेत. गेल्या काही काळापासून भारतीय संघातून संधी मिळाली नसली तर अद्याप मैदानावर परतण्याची हरभजनची इच्छा आहे.

वाचा-
हरभजनने १९९८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघाच्या २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप विजेतेपदाच्या संघात हरभजनचा समावेश होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती एका कसोटी मालिकेने… ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या कसोटी मालिकेनंतर हरभजन सिंगचे आयुष्यच बदलू गेले.

वाचा-
ऑस्ट्रेलियाचा संघ २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. तीन कसोटी मालिका खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलग १५ कसोटी सामने जिंकले होते. जागतीक क्रिकेटमध्ये हा एक विक्रम होता.

तेव्हा भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने हरभजनला संघात घेण्याचा निर्णय घेतला. कारण अनिल कुंबळे त्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या मालिकेआधी हरभजनची कामगिरी फार चांगली नव्हती. पण गांगुलीने त्याच्यावर विश्वास दाखवला.

वाचा-
भारताविरुद्धच्या पहिल्या मुंबई कसोटीत ऑस्ट्रेलियाने फक्त ३ दिवसात १० विकेटनी विजय मिळवला. भारतीय भूमीत १९६९ नंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न ऑस्ट्रेलियाचे होते. मुंबईत हरभजनने ४ विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा हा १६वा विजय होता. दुसरी कसोटी कोलकाता येथे होती. या सामन्यात जे झाले ते भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्याआधी कधीच घडले नव्हते. या सामन्यात हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केली.

कोलकाता कसोटीत हरभजन सिंगने एकूण १३ विकेट घेतल्या आणि जगातील अन्य कोणत्याही संघाला जमले नाही ते भारतीय संघाने करून दाखवले. ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला. या विजयाने मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर होती चेन्नई कसोटी, ज्यात हरभजन सिंगने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ८ विकेट घेत खळबळ उडवून दिली. भारताने मालिका २-१ ने जिंकली.

चेन्नईत हरभजनला सामानावीर आणि मालिकेत ३२ विकेट घेतल्याबद्दल मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. या मालिकेत भज्जीने कोलकाता कसोटीत हॅटट्रिक घेतली होती. भारतीय कसोटी क्रिकेटमधील ही पहिली हॅटट्रिक ठरली. या एका मालिकेने तो स्टार झाला आणि त्यानंतर त्याने मागे फिरून पाहिले नाही.

हरभजनने १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट घेतल्या. तर २ शतक आणि ९ अर्धशतकांसह २ हजार २२५ धावा केल्या. वनडेत त्याने २३६ सामन्यात २६९ विकेट, तर २८ टी-२० सामन्यात २५ विकेट घेतल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here