वाचा-
विराट कोहली इस्टाग्रामवरील भारतातील सर्वात महाग सेलिब्रिटी ठरला आहे. एका पोस्टमागे सर्वात जास्त पैसे घेणारा विराटने भारतातील अन्य सर्व सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. ब्रिटनमधील सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी असलेल्या HOPPER HQने इस्टाग्रामवरील श्रीमंत लोकांची यादी () जाहीर केली आहे. या यादीत विराटचा क्रमांक २६वा आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या ६६.२ मिलियन इतकी असून तो एका पेड पोस्टसाठी तब्बल २.२ कोटी इतकी रक्कम घेतो.
वाचा-
भारतीय सेलिब्रिटीमध्ये विराट अव्वल स्थानी असून अभिनेत्री दुसऱ्या स्थानावर आहे. प्रियांका एका पेड पोस्टसाठी २.१५ कोटी इतकी रक्कम घेते. गेल्या वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रियांका जागतिक क्रमवारीत १९व्या तर विराट २३व्या स्थानावर होता. आता विराट २६व्या तर प्रियांका २८व्या स्थानावर आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर हॉलिवूडचा स्टार आणि माजी रेसरल ड्वेन जॉनसन असून तो एका पेड पोस्टसाठी ७.५८ कोटी इतकी रक्कम घेतो. दुसऱ्या स्थानावर काइली जेनर असून ती ७.३६ कोटी इतकी रक्कम आकारते. खेळाडूंचा विचार केल्यास स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्ड ६.६४ कोटी इतके पैसे घेतो. तो यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
वाचा-
भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू देखील अव्वल
याआधी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या ग्लोबल अॅडव्हाझरी फर्म डफ अॅण्ड फेल्प्सने जाहीर केलेल्या रिपोटनुसार भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू मध्ये सर्वांना मागे टाकत विराट कोहलीने अव्वल स्थान मिळवले होते. विराटने सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान मिळवले होते. विराटची ब्रँड व्हॅल्यू २३७.५ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे १ हजार ६९१ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू २३ मिलियन डॉलर इतकी आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू रोहितपेक्षा तब्बल १० पट अधिक आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times