नवी दिल्ली: हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. पण या सभ्य लोकांच्या खेळातील एका खेळाडूने केलेल्या असभ्य वर्तनाबद्दल न्यायालायने शिक्षा सुनावली आहे. मुळचा ऑस्ट्रेलियाचा असलेला आणि इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या एका क्रिकेटपटूला संघातील सहकाऱ्याच्या प्रेयसीवर केल्याप्रकरणी न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

वाचा-
काऊंटी क्रिकेटमधील वूस्टरशर संघाकडून खेळणारा अष्ठपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू याला न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले होते. या प्रकरणी १ जुलै रोजी झालेल्या सुनावणी त्याला पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हेपबर्नला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते. या निर्णयाच्या विरोधात त्याने वूस्टरशर क्राउन येथील वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. वरिष्ठ न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा दिला नाही. उलट कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याला आता पाच वर्ष तुरुंगात काढावी लागणार.

वाचा-

काय आहे प्रकरण

हेपबर्नने झोपेत असलेल्या एका महिलेवर बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरील एका अश्लिल गेममध्ये दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी त्याने बलात्कार केल्याचे केल्याचे समोर आले. या गेममध्ये निश्चित केलेल्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त महिलेसोबत शरीर संबंध ठेवण्याचे आव्हान देण्यात आले होते. हे आव्हान हेपबर्नने स्विकारले आणि ते पूर्ण करण्यासाठी संघातील सहकारी जो क्लार्कच्या प्रेयसीवर बलात्कार केला.

वाचा-
ही घटना १ एप्रिल २०१७ ची असून न्यायालयातील सुनावणी दरम्यान संबंधित तरुणीने मी झोपेत असताना ही घटना घडल्याचे सांगितले. प्रथम माझ्या जवळ आलेली व्यक्ती प्रियकर असल्याचे वाटले. पण नंतर तो हेपबर्न असल्याचे समजल्यानंतर त्याला विरोध केला. न्यायालयाने पीडित तरुणीची साक्ष आणि अन्य पुराव्यांच्या आधारावर हेपबर्नला दोषी ठरवले.

हेपबर्न मुळचा ऑस्ट्रेलियाचा असून क्रिकेट खेळण्यासाठी तो २०१३ साली इंग्लंडमध्ये आला होता. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असताना आता बलात्कारप्रकरणी पाच वर्ष तुरुंगात काढावी लागणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here