मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर हा टेनिसचा मोठा चाहता आहे. टेनिसमधील दिग्गज खेळाडू हा सचिन मित्र असून इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामन्यांना तो हजेरी लावतो. सचिन जवळ जवळ प्रत्येक वर्षी विम्बल्डनमधील सामने पाहण्यासाठी जातो.

वाचा-
करोना व्हायरसमुळे यावर्षी होणारी सलग तिसरी ग्रॅड स्लॅम स्पर्धा, विम्बल्डन रद्द करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जगातील सर्वात जुनी ग्रॅड स्लॅम स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली. या वर्षी २० जून ते ११ जुलै या काळात विम्बल्डन स्पर्धा होणार होती. आता ही स्पर्धा रद्द करण्यात आली असून पुढील वर्षी म्हणजे २०२१ साली २८ जून ते ११ जुलै या काळात तिचे आयोजन केले जाईल.

वाचा-
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शुक्रवारी रात्री त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत सचिन कोर्टवर एक शॉट मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचा सल्ला मागितला आहे.

वाचा-
मित्रा फेडरर… माझा फोरहॅडसाठी काही टिप्स? आता सचिनच्या या विनंतीवर फेडरर काय उत्तर देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ट्विटवर हे दोन्ही दिग्गज एकमेकांना फॉलो करतात.

वाचा-

क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू म्हणून सचिनचा उल्लेख होतो. असाच उल्लेख टेनिसमध्ये रॉजर फेडररचा केला जातो. ३८ वर्षीय फेडररने २० ग्रॅड स्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here