Georgina Rodríguez Photo : सध्याच्या घडीला जगातील महान फुटबॉलर म्हटलं तर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लिओनल मेस्सी (Lional Messi). दरम्यान या दोघांमध्ये मैदानावर अगदी कट्टर लढाई असली तरी खाजगी जीवनात दोघांमध्ये कोणतेही वाद आजवर समोर आलेले नाहीत. नुकतीच रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ( Georgina Rodríguez) हिच्या फोटोवर मेस्सीची पत्नी Antonela Roccuzzos हिने केलेली एक कमेंट प्रचंड व्हायरल होत आहे.

जॉर्जिनाने जीममध्ये व्यायाम करतानाचा एक फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या असताना मेस्सीची पत्नी Antonela Roccuzzos हिनेही फायर इमोजी (🔥) पेस्ट करत जॉर्जिनाच्या फोटोची एकप्रकारे स्तुती केली आहे. दरम्यान हीच कमेंट व्हायरल होत असून बातमी अपडेट होईपर्यंत 800 हून अधिक जणांनी ही कमेंट लाईक केली आहे. इतर कोणत्याही कमेंटच्या तुलनेत या कमेंटला सर्वाधिक लाईक्स आले आहेत.

पाहा फोटो –


फोटोवर मेस्सीची पत्नी Antonela Roccuzzos ची कमेंट –

आगामी विश्वचषकात रोनाल्डो-मेस्सीकडे सर्वांचं लक्ष

महान फुटबॉलर रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांचा आगामी फिफा वर्ल्डकप अखेरचा विश्वचषक असू शकतो, दोघेही निवृत्त होण्याची शक्यता असल्याने यंदा अखेरदा दोघेही फिफाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कतारमध्ये होणाऱ्या या आगामी विश्वचषकावेळी जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष रोनाल्डो आणि मेस्सी यांच्याकडे असणार आहे.

हे देखील वाचा-sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here