रॉजर फेडररची अखेरची मॅच

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररला त्याच्या करिअरच्या अखेरच्या लढतीत विजय मिळवता आला नाही. ४१ वर्षीय अखेरची लढत दुहेरीत खेळली होती. या लढतीत त्याचा जोडीदार होता स्पेनचा टेनिस स्टार राफेल नडाल, अखेरच्या या लढतीनंतर फेडररला अश्रू रोखता आले नाही. तो ढसाढसा रडला इतक नाही तर नडालला देखील अश्रू आवरता आले नाही.
अखेरच्या लढतीत पराभव

लंडनमध्ये झालेल्या ‘लेव्हर कप’मध्ये फेडररने करिअरची अखेरची मॅच खेळळी. मात्र या लढतीत त्याला विजय मिळवता आला नाही. त्याची लढत अमेरिकेच्या फ्रांसेस टियाफो आणि जॅक सॉक या जोडीविरुद्ध होती.
२० ग्रँड स्लॅम विजेतेपद, पण…

करिअरमध्ये २० ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या फेडररला अखेरच्या सामन्यात ४-६, ७-६(२), ११-९ असा पराभव स्विकारावा लागला.
कट्टर प्रतिस्पर्धी देखील रडले

मॅच झाल्यानंतर सोशल मीडियावर फेडररचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो ढसाढसा रडताना दिसतोय. फक्त फेडरर नाही तर त्याचा निरोपाचा सामना पाहण्यास आलेले अन्य दिग्गज खेळाडू देखील भावूक झालेले दिसले.
२०१८ साली अखेरचे ग्रँड स्लॅम

रॉजर फेडररने २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन ऑपनचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा २० ग्रँड स्लॅम विजेतपद मिळवणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरला होता.
कामगिरी घसरली

२०१८ नंतर त्याला एकही ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. २०२१ मध्ये त्याने फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता.
निवृत्तीची भावनिक पोस्ट

फेडररने या महिन्याच्या १५ तारखेला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times