वाचा-
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. या स्पर्धेने भारताला अनेक दिग्गज आंतरारष्ट्रीय खेळाडू दिले. असे फारच कमी खेळाडू असतील जे रणजी न खेळता भारतीय संघात आले. या खेळाडूंनी रणजी स्पर्धेत असे अनेक विक्रम केले आहेत जे मोडणे जवळपास अशक्य आहेत.
वाचा-
सर्वाधिक शतक: रणजी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम वासीम जाफरच्या नावावर आहे. जाफरने रणजी स्पर्धेत सर्वाधिक ३६ शतक केली आहेत. इतक नव्हे तर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहेत त्याने १२ हजार ३८ धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम मुंबईकडून खेळणाऱ्या अमोल मजूमदार याच्या नावावर होता. मजूमदारने रणजी स्पर्धेत ९ हजार २०२ धावा केल्या होत्या.
सर्वाधिक विकेट आणि धावा: रणजी स्पर्धेच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम दिल्लीकडून खेळणाऱ्या बिशन सिंह बेदी यांच्या नावावर आहे. बेदी यांनी १९७४-७५ साली एका मोसमात ६४ विकेट घेतल्या होत्या. हा विक्रम आजपर्यंत त्यांच्या नावावर आहे.
वाचा-
तर या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. एका मोसमात लक्ष्मणने १ हजार ४१५ धावा केल्या. त्याने ही कामगिरी १९९९-२००० साली केली होती.
वाचा-
सर्वाधिक विकेट: रणजी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम राजिंदर गोयल या खेळाडूच्या नावावर आहे. गोयल यांनी संपूर्ण रणजी करिअरमध्ये ७५० विकेट घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. रणजी स्पर्धेत इतकी शानदार कामगिरी केल्यानंतर देखील त्यांना भारतीय संघात संधी मिळू शकली नाही.
वाचा-
एका डावात सर्वाधिक धावा: रणजी स्पर्धेत एका डावात सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राकडून खेळताना निंबाळकर यांनी १९४८ साली काठियावाड विरुद्ध चार दिवसाच्या सामन्यात ४४३ धावा केल्या. प्रथम श्रेणी सामन्यात जागतिक स्तरावर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने १९९४ साली डरहमविरुद्ध नाबाद ५०१ धावा केल्या होत्या. तर हनीफ मोहम्मद ४९९, सर डॉन ब्रॅडमन यांनी १९३० साली क्वींसलँडविरुद्ध ४५२ धावांची खेळी केली होती.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times