नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ आणि खेळाडू यांच्या चाहते जगभर आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचे कौतुक जगभरातील आजी-माजी खेळाडू करत असतात. पण भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये तिला भारतीय क्रिकेटपटू नव्हे तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू आवडत असल्याचे सांगितले. इतक नव्हे तर तिला अक्षय कुमारशी विवाह करायचा होता असे ही ती म्हणाली.

वाचा-
पाकिस्तानचा क्रिकेटपटू आणि सानियाचा पती शोएब मलिक हे दोघे इस्टाग्रामवर चाहत्यांशी बोलत होते. या चॅट दरम्यान शोएबने विचारलेल्या प्रश्नावर सानिया उत्तर देत होती. शोएबने सानियाला सर्वात आवडता क्रिकेटपटू कोणता असा प्रश्न विचारला. यावर तिने पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आजम असे उत्तर दिले. यावर शोएब मात्र त्याची आवडती भाभी दुसरी असल्याचे सांगत सानियाची फिरकी घेतली. काही दिवसांपूर्वी बाबरने नव्हे तर सरफराज अहमदची पत्नी सर्वात आवडती भाभी असल्याचे म्हटले होते.

वाचा-

यावर सानियानी म्हणाली की, मला माहिती नाही की तो असा का बोलला. पण मी आणि बाबर छान गप्पा मारतो.

पती समोरच सांगितले की या अभिनेत्याशी विवाह करायचा होता
लाइव्ह चॅटमध्ये शोएबने टॉम क्रूझ आणि अक्षय कुमार यांच्यापैकी कोणाशी विवाह करण्यास आवडेल असा प्रश्न विचारला त्यावर सानियाने अक्षय असे उत्तर दिले. अक्षय माझा आवडता आवडता अभिनेता आहे. मी त्याच्या मोहरा चित्रपटापासून चाहती असल्याचे तिने सांगितले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here