वाचा-
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉग याने त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. हा विक्रम अन्य कोणी नाही तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीच मोडू शकतो. विराटचा फिटनेस सर्वोत्तम आहे. त्याच बरोबर सध्या क्रिकेट सामने देखील अधिक खेळले जातात.
वाचा-
यात कोणतीही शंका नाही की, १००हून अधिक शतक करेल. जेव्हा सचिनने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली तेव्हा त्याचा फिटनेस चांगला होता. त्याला चांगले फिटनेस ट्रेनर्स भेटले.
वाचा-
सध्या बोर्डकडून चांगले फीजिओ आणि डॉक्टर उपलब्ध असतात. त्यामुळे खेळाडूचे कमी सामने मीस होतात. तसेच आजकल सामने देखील अधिक होतात. त्यामुळेच विराट कोहली सचिनचा विक्रम नक्कीच मोडू शकेल. विराट आणि सचिनची नेहमीच तुलना केली जाते. याआधी देखील अनेकांनी सचिनचा विक्रम फक्त विराट मोडू शकतो असे म्हटलय.
वाचा-
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक केल्यानंतर निवृत्ती घेतली होती. सचिनने वनडेत ४९ तर कसोटीत ५१ शतक केली आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा, त्याने ७१ शतक केली आहेत. सध्या विराटच्या नावावर ७० शतक असून त्यापैकी ४३ शतक वनडेत तर २७ कसोटीत केली आहेत.
वाचा-
विराटने ८६ कसोटी सामन्यात ५३.६२ च्या सरासरीने ७ हजार २४० धावा केल्या आहेत. पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने नाबाद २५४ धावांची सर्वोच्च खेळी केली. तर २४८ वनडेत ५९.३च्या सरासरीने ११ हजार ८६७ धावा केल्या असून १८३ ही सर्वोच्च खेळी आहे.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times