सुर्याची दमदार फलंदाजी

सुर्यकुमार यादवने तिसरा सामना चांगलाच गाजवला. विराट कोहलीनंतर सुर्या मैदानात उतरला. पण सुर्याने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत विराट कोहलीपूर्वीच अर्धशतक झळकावले. सुर्याचा एक फटका पाहून तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करही चक्रावले. भारताचे २ विकेट्स पडले असले तरी त्यानंतर सुर्यकुमार यादव मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. कोहलीनंतर येऊनही त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत कोहलीच्या आधीच अर्धशतक झळकावलं. सुर्या आता मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण मोठा फटका मारताना सूर्या बाद झाला. सूर्याने यावेळी ३६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ६९ धावांची दमदार खेळी साकारली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here