वाचा-
फ्लॉवर आणि युनिस यांच्याच झालेल्या या घटनेला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याची महत्त्वाची भूमिका असू शकते. फ्लॉवर २०१४ ते २०१९ या काळात पाकिस्तान संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. ‘कॉट बिहाइंड’ या यू ट्यूब चायनलवरील शो मध्ये लतीफ म्हणाला, आम्हाला माहिती नाही ड्रेसिंग रुम मध्ये काय झाले. पण यामागे अझरूद्दीन असो शकतो. २०१६ साली युनिसने ओव्हर मैदानावर द्विशतकी खेळी केली होती. तेव्हा त्याने फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लावर यांचे नाव घेतले नाही. द्विशतकी खेळी केल्यानंतर युनिस म्हणाली की, मी फलंदाजी चांगली होण्यासाठी संघर्ष करत होतो आणि तेव्हा मी अझरूद्दीनशी चर्चा केली.
वाचा-
फ्लॉवर आणि युनिस यांच्यात जे झाले त्याला हे एक मोठे कारण असू शकते. खेळाडू प्रशिक्षकाच्या ऐवजी अन्य कोणाचे तरी नाव घेतो. फ्लावर यांनी कोच म्हणून निश्चितपणे काम केले आणि पाकिस्तानची सेवा केली. पण मला वाटते की अझरूद्दीन फॅक्टर फ्लॉवर यांच्या डोक्यात असेल, असे लतीफ म्हणाला. काही दिवसांपूर्वी फ्लावरने भाऊ अॅण्डी आणि नील मॅथोर्प यांच्यासह एका शोमध्ये युनिस संदर्भातील धक्कादायक खुलासा केला होता.
वाचा-
काय झाले होते फ्लॉवर आणि युनिस यांच्यात…
फ्लॉवर यांच्या सोबत झालेल्या या घटनेत तेव्हाचे पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांना मधे पडावे लागले. या घटनेबद्दल बोलताना फ्लॉवर म्हणाले, युनिश खानला प्रशिक्षण देणे फार अवघड होते. ब्रिसबेन येथील एक घटना मला लक्षात आहे. कसोटी सामन्याच्या दरम्यान, सकाळी नाष्टा करताना मी त्याला फलंदाजीसंदर्भात काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला माझा सल्ला आवडला नाही आणि युनिसने गळ्यावर चाकू धरला. तेव्हा मिकी आर्थर माझ्या शेजारी बसले होते. युनिसला शांत करण्यासाठी आणि माझा बचाव करण्यासाठी आर्थर यांना हस्तक्षेप करावा लागला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times