वाचा-
येत्या ८ तारखेपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोसटी मालिका सुरू होणार आहे. क्रिकेटच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुनरागमनच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत क्रिकेटमधील करोना आधीच्या काही सामन्याचे क्षण दाखवण्यात आले आहेत. क्रिकेट पुन्हा परतत आहे आणि त्याचा धरार पुन्हा एकदा पाहता येईल, असे आयसीसीने सुचवले आहे.
वाचा-
करोना व्हायरसची भीती असून देखील इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तसेच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेचे आयोजन केले. यासाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू इंग्लंडमध्ये आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन झाले. आता ८ जुलै रोजी पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होईल. या मालिकेचे थेट प्रसारण भारतात दुपारी ३.३० वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना १६ जुलै रोजी तर तिसरा आणि अखेरचा सामना २४ जुलै रोजी होणार आहे.
वाचा-
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्येकी ३ सामन्यांची कसोटी आणि टी-२० मालिका होणार आहे. यासाठी पाकिस्तानचा संघ काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये दाखल झालाय.
वाचा-
करोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटमधील काही नियम बदलण्यात आले आहेत. यामुळे मैदानावरील आनंद आणि जल्लोष करण्याचे स्वरुप देखील बदलणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times