भारताचा कर्णधार विराट कोहलीवर बीसीसीआयचा नियम मोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे क्रिकेट ठप्प पडलेले आहे, पण तरीही या काळात कोहलीवर बीसीसीआयचा नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

क्रिकेटपटू हे फक्त क्रिकेट खेळत नाहीत तर ते काही जाहीरातींमध्येही काम करत असतात. आपले सर्व करार पाहण्यासाठी क्रिकेटपटू काही कंपन्यांची मदत घेत असतात. या कंपन्या खेळाडूंचे करार आणि अन्य काही गोष्टी सांभाळत असते, अशाच एक कंपनीमध्ये विराट हा एका पदावर आहे. त्यामुळे विराटने परस्पर हितसंबंध जपले आहेत, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

काय आहे आरोप…कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड, ही कंपनी भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंचे करार पाहते. या कंपनीमध्ये कोहली एका पदावर कार्यरत आहे, असा आरोप मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी केला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार एखादी व्यक्ती एकाच पदावर कार्यरत राहू शकते. जर दोन्ही पदांचा एकमेकांशी संबंध असला तर ते परस्पर हितसंबंध जपल्यासारखे समजले जाते. त्यामुळे कोहली या कंपनीबरोबर कार्यरत असेल तर तो परस्पर हितसंबंध जपत आहे, असे गुप्ता यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

कंपनी कोणाची आहे…कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड, ही कंपनी भारताचा सलामीवीर रोहित शर्माची पत्नी रितिकाच्या भावाची आहे. बंटी सचदेव असे त्याचे नाव आहे. या कंपनीच्या एका मोठ्या पदावर विराट कार्यरत असून तो परस्पर हितसंबंध जपत असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

बिनबुडाचे आरोपयावेळी कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बंटी यांनी कोहलीवर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, ” विराटची प्रतिम खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण विराटने परस्पर हितसंबंध जपलेले नाहीत. विराटवर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, त्याला काहीही अर्थ नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here