वाचा-
धोनीला बाईक आणि गाड्यांचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे धोनीकडे बऱ्याच वेगवेगळ्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर भारतीय सैन्याबाबत धोनीच्या मनात प्रचंड आदर आहे आणि त्यांच्याबरोबर धोनीने काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये ट्रेनिंगही केली होती. सैन्याबरोबर राहून धोनी काही गोष्टी नक्कीच शिकला आहे. पण या गोष्टी पूर्वी पासूनच धोनीला येत होत्या. यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवर नेम धरणे. मैदानात धोनी यष्टीरक्षक करत असताना किती चपळ असतो, हे तुम्ही पाहिलेही आहे. त्याचबरोबर मैदानाबाहेरही धोनीने बऱ्याचदा मनं जिंकली आहेत.
सुरेश रैना हा धोनीचा लाडका क्रिकेटपटू. त्यामुळे धोनी मैदानाबाहेची मजा-मस्ती रैनाबरोबर करायचा. त्यामुळे रैनाकडे धोनीचे आतापर्यंत कोणीही न पाहिलेले बरेच व्हिडीओ आहेत. त्यामधील एक व्हिडीओ रैनाने धोनीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये धोनी बंदुकीने शुटींग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीबरोबर काही मित्रही यावेळी तिथे उपस्थित आहेत. धोनी ज्यापद्धतीने नेम धरतो, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण धोनीचा नेम सर्वात परफेक्ट असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच धोनी जेव्हा नेम धरत होता तेव्हा त्याचे मित्र त्याला सपोर्ट करत होते. धोनीने यावेळी समोर ठेवलेल्या जवळपास सर्वच गोष्टींवर अचूक नेम धरल्याचे यावेळी पाहायला मिळाले होते.
धोनीने निवृत्ती घेतली त्यापूर्वी धोनीने आपली जर्सी भारतीय संघातील डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला दिली होती. याबाबत रैना म्हणाला की, ” सकाळी धोनी माझ्याकडे आला आणि त्याने मला एक जर्सी भेट दिली. त्यावेळी मला त्याचा अर्थ समजला नव्हता. त्यानंतर धोनी न्याहारी करायला गेला. शांतपणे, कोणाशीही न बोलता धोनी न्याहारी करत होता. त्यावेळीच मला वाटलं होतं की, आज संध्याकाळी काही तरी नक्कीच घडणार आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times