मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या वाढदिवसाला मुंबई पोलिसांनी एक वेगळा ट्विस्ट दिला आहे. धोनी आज त्याचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यासह आजी-माजी खेळाडू धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

वाचा-
धोनीचे चाहते सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो, त्याचे क्रिकेटचे व्हिडिओ शेअर करून शुभेच्छा देत आहेत. क्रिकेट जगतात किंवा चाहत्यांमध्ये धोनीची ओळख ही कॅप्टन कुल, MSD अशा नावाने केली जाते.

वाचा-
भारताच्या या माजी कर्णधाराला मुंबई पोलिसांनी हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यांवर एक फोटो शेअर केला आहे. एका क्रिकेट स्टेडियममध्ये विकेट, बॉल, बॅट आणि अन्य साधने दिसतात. यात MSD असे इंग्रजी शब्द लिहले आहेत. आता तुम्हाला वाटेल की MSDचा अर्थ अशा अर्थ असेल तर नाही. मुंबई पोलिसांनी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर MSDअर्थ Maintain Social Distancing असा (सामाजिक अंतर राखा) सांगितला आहे.

वाचा-
या फोटोसोबत पोलिसांनी म्हटले आहे की, सध्याच्या काळात गोष्टी माही प्रमाणे करा. स्टे नॉट आऊट, स्टे कुल. वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन कुल.

करोना व्हायरसचे रुग्ण रोज वाढत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी धोनीच्या नावाचा नवा अर्थ सांगून मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

वाचा-
सर्व सामान्य मुंबईकरांसाठी नेहमी आघाडीवर लढणाऱ्या मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आण्याचे काम अनेक वेळा केले आहे. आता धोनीच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने अतिशय कल्पकतेने नवा अर्थ सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here