आयपीएल होणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. बीसीसीआयनेही आयपीएल भरवण्यासाठी कंबरही कसली आहे. पण आता आयपीएलचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते आहे.

वाचा-

ट्वेन्टी-२० विश्वचषक जर रद्द करण्यात आला तर आयपीएल खेळवली जाऊ शकते. विश्वचषक खेळवण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी अजूनही विश्वचषक होऊ शकत नाही, असे म्हटलेले नाही. त्याचबरोबर अजून काही काळ वाट पाहून ते विश्वचषकाबाबत निर्णय घेतील. पण दुसरीकडे जोपर्यंत विश्वचषक रद्द होत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवली जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला बीसीसीआयचे लक्ष आयसीसीकडे लागलेले आहे.

वाचा-

ट्वेन्टी-२० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न हे क्रिकेटच्यादृष्टीने मोठे शहर आहे. पण मेलबर्नमध्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु करण्यात येणार आहे. सहा आठवडे हे लॉकडाऊन असेल आणि बुधवारपासून ते सुरु होणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील सध्याची परिस्थिती ही कोणतीही क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या परिस्थितीत ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळवण्याची जोखीम आयसीसी उचलेल, असे वाटत नाही.

वाचा-

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळातील काही व्यक्तींनी विश्वचषक खेळवणे सोपे नसल्याचे म्हटले होते. कारण विश्वचषकासाठी आठ देशांचे संघ येतील. या संघांची व्यवस्था करणे सध्याच्या घडीला सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले होते. ही गोष्ट आयसीसीलाही चांगलीच माहिती आहे. पण अजूनपर्यंत विश्वचषकाबाबत कोणतेही विधान त्यांनी केलेले नाही. त्यामुळे आता याबाबत आयसीसी नेमकी काय भूमिका घेते, याकडे बीसीसीआयचे लक्ष लागलेले आहे. पण तरीही बीसीसीआयमधील व्यक्तींना आता आयपीएल होणार, याबाबतचा विश्वास वाढलेला आहे. कारण जर ऑस्ट्रेलियानेच विश्वचषक खेळायला नकार दिला तर आयसीसीला विश्वचषक रद्द करण्यावाचून सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here