धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. जर आयपीएल झाली नाही तर धोनीची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण धोनीने मात्र या गोष्टीचे जास्त दडपण घेतलेले नाही. त्यामुळेच धोनी सध्याच्या घडीला शेतकरी बनल्याचे पाहायला मिळते आहे. धोनी सध्याच्या घडीला आपल्या शेतामध्ये काम करत असल्याचे पाहायलला मिळाले आहे. धोनी एका ट्रॅकरमधून ही शेती करत असल्याचे फोटोही पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोनीने निवृत्तीनंतर नेमके काय करायचे, याचा विचार फार पूर्वीपासून केलेला दिसत आहे.
देशसेवा करायला धोनीला आवडते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी धोनी काश्मीरमध्ये भारताच्या सेनेबरोबर राहीला होता. त्याचबरोबर भारताच्या मातीबद्दलही धोनीला प्रेम आहे. त्यामुळेच त्याने शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. धोनीकडे जवळपास ४० एकर एवढी शेती असल्याचे समजते. धोनी या शेतांमध्ये फळझाडांची जास्त लागवड करतो. ही शेती सेंद्रीयपद्धतीने केली जाते. धोनी जास्तकरून पपई किंवा केळ्यांची झाडं लावतो. काही दिवसांत धोनी आपला शेतीविषयक एक ब्रँड आणणार आहे. या सर्व गोष्टींची तयारी सध्याचा घडीला सुरु झाली आहे. येत्या ३-४ महिन्यांमध्ये धोनीचा हा नवीन ब्रँड बाजारात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघाकडून खेळताना धोनीने अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. धोनीचा आज ३९वा वाढदिवस आहे. या निमित्ताने क्रिकेट आणि अन्य क्षेत्रातील खेळाडू त्याला शुभेच्छा देत आहेत. गेल्या वर्षभरापासून धोनी मैदानात दिसला नसला तरी आजही चाहत्यांसाठी तो फेव्हरिट आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंबरोबर धोनी खेळला आहे, त्यांनाही धोनीबद्दल आपुलकीची भावना आहे. त्यामुळेच धोनीच्या वाढदिवशी त्याच्याबरोबर खेळणाऱ्या खेळाडूंनीही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. पण धोनीने मात्र याबाबत आपली प्रतिक्रीया कुठेच दिलेली दिसत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times