नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सर्व क्षेत्रातील कामाची पद्धत बदलली आहे. लोकांच्या जगण्याची नवी पद्धत आली असून यामुळे क्रीडा क्षेत्रातही मोठे बदल झाले. गेल्या ३ महिन्यांपासून अनेक खेळ बंद आहे. काही स्पर्धा पुढे ढकलल्या तर काही स्थगित करण्यात आल्या. आता हळूहळू काही देशात फुटबॉलसह अन्य स्पर्धा सुरू केल्या जात आहेत. क्रिकेट स्पर्धा मार्च महिन्यापासून बंद होत्या. आता ११६ दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात होत आहे. ही एक ऐतिहासिक घटना असून आज दुपारी साडे तीन वाजता जे होणार आहे ते याआधी कधीच घडले नव्हते.

वाचा-
करोना व्हायरसमुळे बंद झालेले क्रिकेट आजपासून सुरू होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होईल. दुपारी साडे तीन वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात क्रिकेटचे नियम बदलले आहेत. पण १४३ वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडणार आहे की, मैदानात एकही प्रेक्षक नसले. रिकाम्या मैदानावर प्रेक्षकांशिवाय प्रथमच कसोटी सामना होणार आहे.

वाचा-
करोना व्हायरसची भीती असताना देखील वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला. दोन्ही संघात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या सामन्यातआधी वेस्ट इंडिजचे खेळाडू १४ दिवस क्वारंटाइन झाले होते. चार महिन्यानंतर सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र असणार नाहीत.

वाचा-
आज जेव्हा हा सामना सुरू होईल तेव्हा दोन्ही संघांचे स्वागत करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानत प्रेक्षक असणार नाहीत. फलंदाजाने शतक अथवा अर्ध शतक केल्यानंतर तो बॅट उंचावून कोणाचे आभार मानणार, गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक नसतील. बंद दरवाज्याआड होणाऱ्या या मालिकेत पंच, खेळाडू आणि रेफरी असतील. पण सर्वात महत्त्वाचे असे प्रेक्षक असणार नाहीत.

१३ मार्चला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अखेरचा सामना खेळवला गेला होता. तीन महिन्यांनंतर होणारा पहिला क्रिकेटचा सामना कसा असेल, याबाबत बऱ्याच चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या नियमांनुसार क्रिकेट कसे खेळवले जाणार आहे, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे आता तीन महिन्यांनंतर होणाऱ्या पहिल्या क्रिकेट सामन्याचे स्वागत चाहते कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here