करोना व्हायरसमुळे गेल्या चार महिन्यांमध्ये एकही क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना झालेला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना चार महिन्यांमध्ये एकही लाइव्ह सामना पाहता आला नव्हता. पण त्यांची ही प्रतिक्षा काही मिनिटांतच आता संपुष्टात येणार आहे. कारण आज दुपारी ३.३० वाजल्यापासून चाहत्यांना क्रिकेटचा लाइव्ह सामना पाहता येणार आहे. १३ मार्चला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अखेरचा सामना खेळवला गेला होता. हा सामना खेळवून आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये चाहत्यांना एकही क्रिकेटचा सामना पाहता आलेला नाही. त्यामुळे आता आजपासून सुरु होणाऱ्या या सामन्याला चाहते कसा आणि किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी मालिका ८ जुलै (आज) पासून सुरु होणार आहे. चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच क्रिकेटची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे थेट प्रसारण भारतीय चाहत्यांना दुपारी ३.३० वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. चार महिन्यांनंतर होणारा पहिला क्रिकेटचा सामना कसा असेल, याबाबत बऱ्याच चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या नियमांनुसार क्रिकेट कसे खेळवले जाणार आहे, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
वाचा-
करोना व्हायरसमुळे क्रिकेट ठप्प झाल्यावर पहिला सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन संघांना खेळायला मिळणार आहे. या सामन्यात सर्व सुरक्षिततेचे उपाय केले जाणार आहेत. त्याबरोबर दोन्ही संघांतील खेळाडूंनी १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची करोना चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतरच हा सामना खेळवला जात आहे. त्यामुळे चाहते या सामन्याचा कसा आनंद घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times