कोहली हा आहाराच्याबाबतीत फारच सजग असतो. सर्व गोष्टी तो मोजून-मापून खाताना दिसतो. त्यामुळेच त्याने आपला फिटनेस चांगला ठेवल्याचे म्हटले जाते. पण आज एका क्रिकेटपटूने आणलेला डोसा मात्र कोहलीला चांगलाच आवडल्याचे पाहायला मिळाले.
वाचा-
सध्याच्या घडीला सर्वच जण आपल्या घरात आहेत. त्यामुळे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्यासाठी त्यांना बाहेर जाता येत नाहीए. त्यामुळे घरात बसूनच जे काही बनेल ते त्यांना खावे लागत आहे. कोहलीने बऱ्याच दिवसांपासून डोसा खाल्लेला नव्हता. त्यामुळे आज डोसा समोर आल्यावर कोहलीला राहावले नाही. कोहलीच्या घराच्या ५०० मीटर अंतरावर एक भारताचा क्रिकेटपटू राहतो. या क्रिकेटपटूने आज कोहलीला सरप्राईज दिल्याचे पाहायला मिळाले. आपल्या घरात बनलेला नीर डोसा आणि सांबार घेऊन तो थेट कोहलीच्या घरीच पोहोचला. या गोड सरप्राईजमुळे कोहलीही खूष झाल्याचे पाहायला मिळाले.
कोहली हा सोशल मीडियावर जास्त असल्याचे पाहायला मिळते. कोहलीने क्रिकेटपटूने आपल्याला दिलेल्या सरप्राईजची गोष्ट सोशल मीडियावर टाकली आणि ती चांगलीच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघातील श्रेयस अय्यर हा कोहलीसाठी आज डोसा घेऊन गेला होता. त्याचे चांगलेच स्वागत कोहलीने केले, त्याचबरोबर श्रेयसला कोहलीने रिकाम्या हाती पाठवले नाही तर त्यालाही आपल्याकडील एक खास पदार्थ त्याने दिला.
कोहलीने सोशल मीडियावर श्रेयसबरोबरचा फोटो पोस्ट केला. या फोटोखली कोहलीने लिहीले की, ” हा शेजारी माझ्यापासून फक्त ५०० मीटरच्या अंतरावर राहतो. त्याच्यामुळेच मला आज बऱ्याच दिवसांनी असा स्वादिष्ठ डोसा खाता आला. त्यामुळे श्रेयस तुझे आणि डोसा बनवणाऱ्या तुझ्या आईचे आभार. मी पाठवलेली मशरुम बिर्याणीही तुला आवडेल, अशी मी आशा करतो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times