आयुष्यात सर्व गोष्टींचे सोंग आणता येते, पण पैशांचे आणता येत नाही. ही गोष्ट खरी उतरली आहे ती पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत. कारण सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडे एकही प्रायोजक नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यापूर्वी जे स्पॉन्सरर होते त्यांच्याबरोबरचा पाकिस्तानच्या संघाचा करार संपुष्टात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला आतापर्यंत दुसरा स्पॉन्सरर मिळालेला नाही. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवर कोणताच लोगो दिसणार नाही. कारण जे आता स्पॉन्सरर येत आहेत ते आधीपेक्षा फार कमी किंमत देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघापुढे मोठा पेच निर्माण झाला होता.
पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडलेला असताना त्यांच्यासाठी आफ्रिदी धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो आता खेळाडूंच्या किट्सवर पाहता येणार आहे. त्यामुळे आता या लोगोसहीत पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे. ही गोष्ट आफ्रिदीनेच सांगितली आहे.
याबाबत आफ्रिदीने ट्विटही केले आहे. आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो पाकिस्तानच्या खेळाडूंच्या किट्सवर पाहताना नक्कीच आनंद होईल. पाकिस्तानच्या संघाला माझ्याकडून शुभेच्छा. पाकिस्तान क्रिकेट मंडळाबरोबर आम्ही चॅरिटी पार्टनर आहोत. त्यामुळे यापुढेही त्यांचा पाठिंहा कायम राहील, अशी आशा मी करतो.”
शोएब अख्तरला सचिन घाबरायचा…नऊ वर्षांपूर्वी आफ्रिदीने असे वक्तव्य केले होते की, महान फलंदाज सचिन तेंडुलकरल पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यास घाबरतो. आता आफ्रिदीने पुन्हा एकदा हीच गोष्ट बोलली आहे. यावेळी तो म्हणाला, सचिन ही गोष्ट कधीच मान्य करणार नाही. पण तो अख्तरला घाबरत होता. विशेष म्हणजे ज्याच्याबद्दल आफ्रिदी बोलत आहे. त्या शोएब अख्तरने कधीच असे वक्तव्य केले नाही. पण फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आफ्रिदीचे वक्तव्य सुरू आहे.
आफ्रिदीने त्याच्या पुस्तकात म्हटले आहे की, सचिन हा शोएबला घाबरत होता. मी स्वत: पाहिले आहे. सामना सुरू असताना मी स्वेअर लेगला उभा होतो. अख्तर गोलंदाजी करण्यास आला की सचिनचे हात पाय थरथरत असत. जैनब अब्बाससोबत यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, सचिन स्वत: ही गोष्ट मान्य करणार नाही की मी घाबरत होतो. शोएबच्या काही स्पेल अशा असायच्या की सचिन नाही तर जगातील सर्वच फलंदाज घाबरत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times