सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे आयपीएल. या वर्षी आयपीएल होणार की नाही? विश्वचषक रद्द होणार का? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडलेले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं एका खास मुलाखतीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक, स्तंभलेखक यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर आज फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून मांजरेकर यांची खास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये करोनानंतरचे क्रिकेट कसे असेल, त्याचबरोबर सुरुवातीला आयपीएल व्हावी कि विश्वचषक, याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला आयपीएल कधी होणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. आशिया चषक रद्द होणार, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काल सांगितले होते. त्याचबरोबर विश्वचषकही रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण आयपीएल की विश्वचषक, कोणत्या गोष्टीने क्रिकेटची धडाकेबाज सुरुवात व्हायला हवी, याबाबत मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मांजरेकर म्हणाले की, ” जेव्हा क्रिकेट पूर्वपदावर येईल. तेव्हा प्रेक्षक मैदानात जाऊन सामना पाहू शकतील की नाही, हे सांगू शकत नाही. पण जेव्हा टीव्हीवर क्रिकेट सुरु होईल तेव्हा माझ्यामते आयपीएल पहिलं होईल. ”

पहिलं आयपीएल का व्हायला हवं…पहिली मोठी स्पर्धा आयपीएल होईल. त्यानंतर टी-२० विश्वचषक होईल. मला वाटतं की आयपीएल पहिलं होईल. मला वाटतं की, सध्याच्या घडीला बराच काळ सरलेला आहे आणि क्रिकेटला पुन्हा आपल्याला सुरु करायचं आहे. तर मला असं वाटतं की, पहिलं आयपीएल व्हायला पाहिजे. हे वर्ष ट्वेन्टी-२० क्रिकटचं होतं. त्यामुळे भारताने सध्या जास्त लक्ष ट्वेन्टी-२० क्रिकेटकडे द्यायला हवं. क्रिकेट सुरु करताना कसोटी सामने वैगेरे सुरु करणं, हे कितपत बरोबर आहे ते माहिती नाही, असेही मांजरेकर यांनी यावेळी सांगितले.

आयपीएल मोठी इंडस्ट्री आहे….आयपीएलवर भारतीय क्रिकेटची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे आयपीएल होणं ही भारतीय क्रिकेटची गरज आहे आणि त्याला प्राथमिकता द्यायला हवी. आयपीएलमध्ये फक्त मजा नाहीए, तर त्यामध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही अवलंबून आहेत. आयपीएल ही एक मोठी इंडस्ट्री आहे. त्यामुळे आयपीएल पहिल्यांदा सुरु व्हायला हवी, असं मला तरी वाटतं, असेही मांजरेकर यावेळी म्हणाले.

खेळाडूंना मैदानात परतायला किती वेळ लागेल…सध्याच्या युगातले खेळाडू हे फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रीत करतात. सर्व खेळाडू आपल्यापरीने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काही ना काही तरी गोष्टी नक्कीच करत असतील. त्याचबरोबर ज्या खेळाडूंना दुखापती आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला ब्रेक आहे. कारण दुखापतींसाठी सर्वात चांगला उपाय हा विश्रांती हा असतो. त्यामुळे दुखापतग्रस्त खेळाडूंना बरं होण्यासाठी हा काळ चांगला आहे. सध्याची पिढी ही सराव सामन्यांवर जास्त भर न देता नेट्समध्ये चांगला सराव करते. या खेळाडूंना नेट्समध्ये चांगला सराव करण्याची संधी मिळाली. पण खेळाडूंना मैदानात परतायला जास्त वेळ लागणार नाही, असेही मांजरेकर यांनी सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here