करोनानंतर चार महिन्यांनंतर पहिल्यांचा खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी होल्डरने नेत्रदीपक कामगिरी करत इंग्लंडला पिछाडीवर ढकलल्याचे पाहायला मिळाले. चार महिन्यानंतर पहिल्यांदा सुरु झालेल्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस हा होल्डरनेच गाजवल्याचे पाहायला मिळाले.

होल्डरने आज अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते. होल्डरने तिखट मारा करत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी घाडण्याची किमया साकारली. होल्डरच्या या दमदार कामिगरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांमध्येच आटोपला. होल्डरने भन्नाट गोलंदाजी करत २० षटकांत फक्त ४२ धावात देत इंग्लंडच्या सहा खेळाडूंना माघारी धाडले. होल्डरने यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन्स स्टोक्सबरोबरच, ऑली पोप, झॅक क्राऊली, जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांना पेव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इंग्लंडने आज १ बाद ३५ या धावसंख्येवरून आपला पहिला डाव सुरु केला. इंग्लंडला यावेळी पहिले दोन धक्के दिले ते वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलने. पण त्यानंतर मात्र होल्डरने भेदक मारा करत इंग्लंडला मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखले. होल्डरच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. इंग्लंडकडून सर्वाधिक ४३ धावा या स्टोक्सने केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here