नवी दिल्ली: आशिया क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आशिया क्रिकेट परिषदेने ही टी-२० स्पर्धा आता पुढील वर्षी आयोजित करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. नियोजित वेळानुसार आशिया क्रिकेट स्पर्धा यावर्षी पाकिस्तानमध्ये होणार होती. पण भारताच्या विरोधामुळे त्याचे ठिकाण बदलले जाणार होते.

आशिया क्रिकेट परिषद ()ने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार आता ही स्पर्धा जून २०२१ मध्ये श्रीलंकेत आयोजित करण्याचा आम्ही विचार करत आहोत. यासाठी विंडो मिळते का यावर आम्ही काम करत असल्याचे एसीसीने म्हटले आहे. सध्या व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.

वाचा-

आसीसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासावर घालण्यात आलेली बंदी, विविध देशात क्वारंटाइन संदर्भातील नियम, आरोग्या बाबतचा धोका आणि सोशल डिस्टसिंगबाबतचे नियम या सर्वाचा विचार करून आशिया कपचे आयोजन करणे एक आव्हानच होते. या शिवाय या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कमशियल पार्टनर, चाहते आणि क्रिकेट विश्वाच्या आरोग्याचा विचार करून ही स्पर्धा स्थगित करण्यात येत आहे.

वाचा-

आशिया कप स्पर्धाचे सुरक्षित आयोजन करण्याला आसीसीचे प्राधान्य आहे. आम्हाला अपेक्षा आहे की पुढील वर्षी २०२१ मध्ये ही स्पर्धा घेता येईल. सध्या आम्ही जून २०२१ मध्ये वेळ मिळते का यावर फोकस करत आहोत.

कालाच बीसीसीआयने आशिया कप स्पर्धा रद्द करण्याची घोषणा करून पाकिस्तानला झटका दिला होता. मागील काही महिने करोनाच्या संकटाने क्रीडा स्पर्धा रोखण्यात आल्या होत्या. त्यात क्रिकेटप्रेमींना श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषकाची उत्सुकता लागली होती. मात्र भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी रद्द झाल्याचे जाहीर केले.

वाचा-
यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय क्रिकेट मंडळाने पाकिस्तानात जाण्यास साफ नकार दिला. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीत (दुबई) ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव पाक क्रिकेट बोर्डाने ठेवला होता. मात्र याच वेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यजमान होण्यासाठी प्रस्ताव दिला आणि भारताने श्रीलंकेची निवड केली. त्यामुळे यंदा आशिया चषक श्रीलंकेत होणार होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here