धोनी धाव घेताना वेगाने आणि चपळतेने धावतो. त्या दिवशी देखील तो पूर्ण जीव लावून धावला होता. पण गप्टिलचा थ्रो थेट विकेटला लागला आणि धोनी थोडक्यात क्रीझमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला.
वाचा-
या घटनेला एक वर्ष झाले. दरम्यानच्या काळात भारताने अनेक मालिका खेळल्या. करोना व्हायरसमुळे टीम इंडिया गेल्या ४ महिन्यांपासून क्रिकेट खेळू शकली नाही. या काळात सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे धोनी निवृत्त होणार आहे का? पण या प्रश्नाचे उत्तर कोणालाच मिळाले नाही. धोनी काहीच बोलला नाही आणि अन्य सर्वांनी त्याचे उत्तर त्याच्यावरच सोडून दिले.
वर्ल्ड कपनंतर धोनी भारतीय लष्करासोबत सरावासाठी काही दिवस गेले. तो भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल आहे. लष्करातील ३ महिन्याच्या सरावानंतर धोनी पुन्हा मैदानात दिसेल असे वाटले होते. पण धोनीने आणखी वाट पहायला लावली. भारताच्या प्रत्येक मालिकेआधी हा प्रश्न विचारण्यात आला धोनी निवृत्त होणार आहे का?
वाचा-
अखेर धोनीने आयपीएल खेळणार असल्याचे जाहिर केले. १ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्जच्या सराव सत्रात तो सहभागी झाला. आयपीएलची सुरूवात २९ मार्च पासून सुरू होणार होती. आयपीएलच्या माध्यमातून त्याला भारतीय संघा पुन्हा प्रवेश करायचा होता. पण करोना व्हायरसमुळे सर्व काही थांबले.
अशी चर्चा होती की धोनी आयपीएलमध्ये धमाका करेल आणि टी-२०च्या भारतीय संघात त्याला स्थान मिळेल. कोच रवी शास्त्रीने देखील ही गोष्टी सांगितले होती. धोनी सोशल मीडियावर फार कमी बोलतो. त्यामुळे आता देखील त्याच्या मनात भविष्याबद्दल काय चालले आहे हे फक्त त्यालाच माहित. अगदी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येवर देखील धोनी काहीच बोलला नाही.
धोनी सध्या रांची येथील कुटुंबासोबत त्याच्या घरी आहे. त्याचे घरातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या सर्व गोष्टी झाल्यानंतर देखील एक प्रश्न शिल्लक राहतो धोनी पुन्हा मैदानावर परतणार की नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times