नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटचा इतिहास रंजक असा आहे. अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीद्वारे इतिहास घडवला. अशा खेळाडूंच्या कामगिरीची आज देखील चर्चा होते. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला आणि पहिला विजेता खेळाडू हा मुळचा भारतीय नसून तर अफगाणिस्तानचा होता. इतक नव्हे तर हा खेळाडू प्रेक्षकांच्या मागणीवर षटकार मारायचा.

भारतीय संघाकडून खेळलेल्या ज्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीची चर्चा होते त्यामध्ये यांचा देखील समावेश होतो. अफगाणिस्तानमधील कबूल येथे जन्मलेले दुर्रानी प्रथम कराची आणि नंतर भारतात आले. दुर्रानी आठ महिन्याचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबीय कराचीला आले. त्यानंतर भारताची फाळणी झाली तेव्हा ते भारतात आले. ६०-७०च्या दशकात दुर्रानी यांनी अष्ठपैलू म्हणून वेगळी ओळख निर्माण केले. भारतीय संघातील एक शानदार अष्ठपैलू असा त्यांचा उल्लेख केला जातो. १९६०च्या दशकात दुर्रानी यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.

वाचा-
दुर्रानी यांनी भारताकडून २९ कसोटीत १ हजार २०२ धावा केल्या. यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी १९६० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटीत पदार्पण केले. दुर्रानी यांचे क्रिकेट करिअर फार मोठे नसेल तरी त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या मागणीवर ते षटकार माराचे.

क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या दुर्रानी यांच्याबद्दल एक अशी घटना घडली होती जी कदाचित अन्य कोणत्या खेळाडूसोबत झाली असेल. १९७३ साली इंग्लंडविरुद्ध कानपूर कसोटीत संघात त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. तेव्हा चाह्यांनी ‘नो दुर्रानी, नो टेस्ट’ असे फलक घेऊन त्याचा विराध केला.

वाचा-
१९६४ साली वेस्ट इंडिज दौऱ्यातील चौथ्था कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४४४ धावा केल्या. भारतीय संघ पहिल्या डावात फक्त १९७ बाद झाला. फॉलोऑन मिळाल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात दुर्रानी यांनी कमाल केली. त्यांनी १०४ धावा केल्या. तसेच पॉली उमरीगर यांच्या सोबत भारताला ४२२ धावांपर्यंत मजल मारून दिली. वेस्ट इंडिजने या सामन्यात जरी विजय मिळवला असला तरी दुर्रानी आणि उमरीगर यांच्या भागिदारीची आजही चर्चा होते.

दुर्रानी यांनी १९७३ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर चरित्र नावाच्या चित्रपटात काम केले. या चित्रपटात परवीन बाबी त्यांची अभिनेत्री होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here