मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात नेहमी कमालीची चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघा दरम्यान जेव्हा सामना होतो तेव्हा खेळातील डावपेचा सोबत स्लेजिंगचा देखील वापर केला जातो. भारताचे माजी विकेटकीपर आणि फलंदाज किरण मोरे हे देखील स्लेजिंगबाबत आघाडीवर असत. यांच्यातील एका सामन्याबाबत एक घटना त्यांनी सांगितली, ज्यात पाकिस्तानचा क्रिकेटपटूने मोरेंना धमकी दिली होती.

वाचा-
‘द ग्रेटेस्ट रायवलरी’ या पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना किरण मोरे म्हणाले, १९८९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. आम्ही पाकिस्तानच्या दौऱ्यावर होतो. मी कराची कसोटीत सलीम मलिकला स्लेज केले होते आणि तेव्हा तो मला बॅटने मारण्यासाठी आला होता. मी त्याला पंजाबी भाषेत अपशब्द वापरला होता.

वाचा-
ते प्रसंग फारच गंमतीशीर होता. तेव्हा क्रिकेटमध्ये मायक्रोफोन नव्हते. जर ते असते तर मजेदार घटना घडल्या असत्या, असे मोरे म्हणाले. जावेद मियादाद यांच्या सोबत झालेला एक किस्सा त्यांनी सांगितला. मियादाद यांची १०० कसोटी होती. लाहोर येथे झालेल्या सामन्यात ते बँटिंग आणि मनिंदर सिंह गोलंदाजी करत होते.

वाचा-
तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये मनिंदर यांचा एक चेंडू मियादादच्या पॅडला लागला. तो चेंडू गुढघ्याच्या खाली आणि विकेटच्या समोर जाणारा होता. तेव्हा मी मोठ्याने अपिल केली. पण अंपायरने बाद दिले नाही. तेव्हा मियादाद म्हणाले, अपील का करतोस. ही माझी १००वी कसोटी आहे आणि मी शतक करूनच घरी जाणार. या सामन्यात मियादादने १४५ धावा केल्या होत्या.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here