नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सर्वांना सक्तीने घरी बसावे लागले होते. आता काही प्रमाणात व्यवहार सुरू होत आहेत. हजारो जणांचे बळी घेतलेल्या या व्हायरसपासून काळजी घेत क्रीडा मैदानात पुन्हा एकदा सामने सुरू झालेत. क्रिकेटचा विचार केल्यास इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू झालेल्या कसोटी सामन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरूवात झाली. या मालिकेमुळे एक क्रिकेटसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले असून लवकरच टी-२० लीगला सुरूवात होणार आहे.

वाचा-
करोना व्हायरसमुळे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ क्रिकेट सामने झाले नव्हते. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने करोनाची भीती असताना मालिका घेण्याचा निर्णय घेतला. आता टी-२० लीगची तयारी सुरू झाली आहे. येत्या १८ ऑगस्टपासून () ला सुरूवात होणार आहे. करोना व्हायरसनंतर सुरू होणारी ही पहिली टी-२० लीग स्पर्धा असेल.

वाचा-
CPL स्पर्धा ३४ दिवस खेळवली जाईल तर फायनल मॅच २० सप्टेंबर रोजी होईल. ही स्पर्धा त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो येथे खेळवली जाणार आहे. यामुळे खेळाडू आणि टीममधील स्टाफला करोना व्हायरसची लागण होण्याचा धोका नाही. या स्पर्धेच्या आयोजनासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून परवानगी मिळाली आहे.

वाचा-
स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडू त्रिनिदादमध्ये दाखल होताच त्या सर्वांना स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर दोन आठवड्यांचा क्वरंटाइन कालावधी पूर्ण केला जाईल. जे खेळाडू विदेशातून येतील त्यांची निघण्याआधी आणि आल्यानंतर करोना चाचणी घेतली जाईल.

करोनाची लागण होण्याचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवली जाईल. करोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन केले जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू प्रवीण तांबे पदार्पण करेल. एखाद्या विदेशी टी-२० लीग स्पर्धेत खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे, तांबे त्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here