दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याटी-२० मध्ये भारताचा ४९ धावांनी पराभव केला

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४९ धावांनी पराभव झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ १८.३ षटकांत १७८ धावा करून सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रिले रोसूने सर्वोत्तम शतक झळकावले.

​क्विंटन डीकॉकने अर्धशतक ठोकले

भारताविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर, क्विंटन डी कॉक आणि कर्णधार तेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले. खराब फॉर्मात असलेला बावुमा पुन्हा एकदा निराश झाला आणि अवघ्या तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, डी कॉकने एका टोकाला धरून राहून गुवाहाटीत जिथे डाव सोडला होता तिथूनच सुरुवात केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन ४३ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला.

​रिले रोसूचे शतक

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सर्वात मोठा स्टार रिले रोसू होता. रिले रोसूने या सामन्यात सर्वोत्तम शतक झळकावले. त्याने ४८ चेंडूत १०० धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ७ चौकारही मारले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामन्यात २० षटकात ३ गडी गमावून २२७ धावा केल्या.

किलर मिलर

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड मिलर तिसऱ्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला आणि त्याने फक्त ५ चेंडूत १९ धावा केल्या. यादरम्यान मिलरने तीन षटकार ठोकले. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने १८ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.

रोसूने ​स्टंप्सवर स्वतःच पाय मारला

दक्षिण आफ्रिकेसाठी सामन्यात १०० धावांची सर्वोत्तम खेळी खेळणाऱ्या रिले रोसूने सामन्यादरम्यान नियंत्रण गमावले आणि त्याचा स्टंप्सवर जाऊन पाय पडला. यानंतर काही काळ खेळही थांबवण्यात आला. मात्र, पंचांनी त्याला बाद घोषित केले नाही.

​मँकडिंगचे नाटक पुन्हा होता होता राहिले

मालिकेतील तिसर्‍या सामन्यात, डावाच्या १६व्या षटकात दीपक चहर चेंडू फेकायच्या आधीच दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स क्रिजच्या बाहेर गेला, पण चहरची त्याच्यावर करडी नजर होती आणि चाहरने त्याला आऊट करण्याची हुल दिली. पण स्टब्स तितक्यात सावरला आणि चाहरने त्याला चेतावणी देऊन सोडला.

​भारतीय गोलंदाज फ्लॉप ठरले

सलग दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचे गोलंदाज महागडे ठरले. भारताकडून सामन्यात फक्त दीपक चहर आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. पण त्यांनी देखील धावा लुटल्या. अशा स्थितीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.

​श्रेयस अय्यरचा रॉकेट थ्रो

या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघाला २० षटकांत केवळ दोन विकेट घेता आल्या. त्याचवेळी क्विंटन डी कॉकला धावबाद करत तिसरी विकेट मिळाली. श्रेयस अय्यरच्या रॉकेट थ्रोमुळे संघाला ही विकेट मिळाली. या सामन्यात डी कॉकने ४३ चेंडूत ६८ धावा केल्या.

ऋषभची उत्कृष्ट खेळी

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून ऋषभ पंतने १४ चेंडूत २७ धावा केल्या. मात्र, त्याचा साथीदार कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय श्रेयस अय्यरही काही विशेष खेळी करू शकला नाही.

दिनेश कार्तिक फॉर्मात

भारताकडून या सामन्यात दिनेश कार्तिकने ४६ धावा केल्या. या डावात कार्तिकने २१ चेंडूंमध्ये चार षटकार आणि चार चौकार मारले. याशिवाय दीपक चहरने ३१ धावांचे योगदान दिले.

​प्रिटोरियस गोलंदाजीत चमकला

गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने तीन बळी घेतले. याशिवाय कागिसो रबाडा, केशव महाराज आणि व्हर्न पारनेल यांनी प्रत्येकी दोन तर लुंगी एनगिडीने एक गडी बाद केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here