याबाबत मांजरेकर म्हणाले की, ” करोनामुळे नुकसान आहे. करोनामुळे आर्थिक गोष्टींवर बराच परीणाम होईल आणि बरेच दिवस ही गोष्ट आपल्याला जाणवत राहील. भारत असा देश आहे की, लोकं काम करायला उत्सुकत आहेत. जगभरात कुठलाही देश असेल जो आपल्या पायावर लवकर उभा राहील तर तो भारत असेल. कारण सध्याच्या घडीला काही कामं देशात सुरु झालं आहेत. लोकंही हळूहळू कामाला लागलेली आहे. आपली इंडस्ट्री जोरदार आहे. त्यामुळे सर्वात लवकर भारताची रीकव्हरी होईल.”
“भारतामधील केंद्र आणि राज्य सरकारने चांगले निर्णय घेतले. त्यामुळे काही गोष्टी चांगल्या झालेल्या पाहायला मिळत आहेत. पण दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात आपणं पाहिलं तर सर्व गोंधळ सुरु आहे, तसं वातावरण आपल्याला भारतामध्ये दिसत नाही. त्यामुळेच भारत करोनानंतर लवकरच पूर्वपदावर येईल,” असे मांजरेकर यांनी सांगितले.
करोनामुळे चार महिन्यांपासून क्रिकेटही ठप्प होते. पण तीन दिवसांपूर्वीच इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे आयपीएल कधी खेळवले जाईल, याची उत्सुकताही चाहत्यांना आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक हा आयपीएलच्या मार्गातील मोठा अडसर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द केला तरच आयपीएल होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण जर आयपीएल खेळवले गेले नाही तर बीसीसीआयला जवळपास चार हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
अमेरिकेत सर्व गोंधळ सुरु आहे…करोनामुळे नुकसान आहे. करोनामुळे आर्थिक गोष्टींवर बराच परीणाम होईल आणि बरेच दिवस ही गोष्ट आपल्याला जाणवत राहील. भारत असा देश आहे की, लोकं काम करायला उत्सुकत आहेत. जगभरात कुठलाही देश असेल जो आपल्या पायावर लवकर उभा राहील तर तो भारत असेल. कारण सध्याच्या घडीला काही कामं देशात सुरु झालं आहेत. लोकंही हळूहळू कामाला लागलेली आहे. आपली इंडस्ट्री जोरदार आहे. त्यामुळे सर्वात लवकर भारताची रीकव्हरी होईल. वैयक्तिक आयुष्यात करोनामुळे पॉझ आला, त्यामुळे मला तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला., असेही मांजरेकर यांनी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times