बीसीसीआयचे अधिकारी असलेले राहुल जोहरी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी महिलेबरोबर असभ्य वर्तन आणि छेढछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आतापर्यंत त्यांनी माफीनामाही दिलेला नाही, असे खळबळजनक वक्तव्य बीसीसीआयच्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या आणि भारताच्या माजी क्रिकेटपटू डायना एड्युल्जी यांनी केला आहे. जोहरी यांच्यावर बीसीसीआयने कोणतीही कठोर कारवाई केली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जोहरी अजूनही बीसीसीआयमध्ये कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाबाबत डायना यांनी सांगितले की, ” हे प्रकरण ऑक्टोबर २०१८ साली बाहेर आले होते. पण याबाबत मला कोणताही धक्का बसला नाही. कारण जोहरी यांचे आत्तापर्यंतचे वर्तन हे असेच राहिलेले नाही. यापूर्वीही अशाच काही गोष्टी त्यांच्याबाबत घडलेल्या आहेत. आतापर्यंत जोहरी यांनी माफीनामाही दिलेला नाही. उलट ज्या व्यक्तीने तक्रार केली तिच्यावरच दबाव आणला जात आहे. त्यामुळे जोहरी हे अजूनही बीसीसीआयमध्ये काम करत असल्याचे मला अजिबात आवडलेले नाही.”
डायना या पुढे म्हणाल्या की, ” या प्रकरणासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. पण या चौकशी समितीकडूनही योग्य काम करण्यात आलेले नाही. याबाबत मी विरोधही केला होता. त्यावेळी जोहरी हे राजीनाम देतील, असेही म्हटले जात होते. पण तसे घडलेले मात्र पाहायला मिळालेले नाही.”
बीसीसीआयचे अध्यक्षपद भाराताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने स्वीकारले. त्यावेळी बीसीसीआयची प्रतिम अजून चांगली केली जाईल, अशी गांगुली यांच्याकडून आशा होती. पण आता डायना यांनी केलेल्या आरोपांमुळे मात्र गांगुलीपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गांगुली नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times