क्रिकेट विश्वासाठी एक धक्कादायक गोष्ट आज पाहायला मिळाली. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू चेतन चौहान यांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियानांही करोनाची चाचणी करावी लागणार आहे. भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर चौहान हे सलामीला यायचे. चौहान यांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचेही प्रतिनिधीत्व केले होते.

वाचा-

चौहान यांना लखनौ येथल संजय गांधी हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. शुक्रवारी जेव्हा चौहान यांना अत्यवस्थ वाटू लागले तेव्हा त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये त्यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भारताचे एक दमदार सलामीवीर म्हणून चौहान यांनी चांगले नाव कमावले आहे. १९७०च्या दशकात सलामी करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण चौहान यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर भारताला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. कारण त्या काळात सलामी करणे अवघड मानले जायचे. कारण त्यावेळी खेळपट्ट्या या गोलंदाजांना थोड्या मदत करणाऱ्या असायच्या. त्याचबरोबर त्या काळात चांगले गोलंदाजही पाहायला मिळायचे. त्यामुळे डावाची सुरुवात करणे, ही त्या काळात सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.

चौहान यांनी १९६९ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४० कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळले होते. गावस्कर यांच्याबरोबर चौहान हे सलामीला यायचे. या दोघांनी एकत्रितपणे तीन हजार धावाही केल्या होत्या, या दोघांनी १९७०च्या दशकामध्ये १० वेळा संघाला शतकाची वेसही ओलांडून दिली होती. यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीलाही करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चौप्राने एक ट्विट करत ही माहितती दिली होती. चोप्राने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” चेतन चौहान हे करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांची तब्येत लवकरच बरी व्हावी, यासाठी मी प्रार्थना करत आहे.”

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनाही करोनाची लागण झाली आहे. मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here